शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीला ‘बिझनेस प्लॅन’ची संजीवनी

By admin | Updated: December 23, 2015 00:13 IST

दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत रूतत चाललेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) स्थिती सुधारण्यासाठी आता खास ‘बिझनेस प्लॅन’ राबविला जाणार आहे.

पुणे : दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत रूतत चाललेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) स्थिती सुधारण्यासाठी आता खास ‘बिझनेस प्लॅन’ राबविला जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून पुढील नऊ महिन्यांत हा आराखडा तयार केला जाणार आहे. तर त्यानंतर पुढील दोन वर्षे या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्नस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस हे काम देण्यात आले असून या प्लॅनसाठी तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी ५ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून या कंपनीबरोबर चार वर्षांचा करार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २००७ मध्ये पीएमटी आणि पीसीएमटीचे विलिनीकरण करून पीएमपीएमएल ही कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र, या कंपनीच्या स्थापनेपासूनच ती सातत्याने तोट्यात असून गेल्या सात वर्षांत हा तोटा १६७ कोेटी रुपयांवर पोहचला आहे. तर कंपनीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याने त्याचा प्रवासी संख्या घटण्यावर परिणाम झाला आहे. तसेच पीएमपीला मिळणारे इतर पर्यायी उत्पन्नही मिळणे कमी झाले आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारण्यासाठी पीएमपीकडून सुमारे तीन वर्षांपूर्वी जेएनएनयुआरएम अंतर्गत हा बिझनेस प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या. मात्र, केंद्रशासनाने निधी देण्यास नकार दिल्याने ही निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र, हा प्लॅन आवश्यक असल्याने तो दोन्ही महापालिका आणि पीएमपीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्लॅनसाठी पुणे महापालिकेने २ कोटी रुपयांचा निधी दिला असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हिस्सा मिळाल्यानंतर उर्वरीत खर्च पीएमपीएमएलकडून करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर दतात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर सुशीला धारडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पीएमपीचे संचालक आनंद अलकुंटे यांच्यासह स्थायी समिती अध्यक्षा आश्विनी कदम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अजय शितोळे, सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ज्या कंपनीस हे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून पुढील नऊ महिन्यांत हा प्लँन तयार केला जाईल. त्यात प्रामुख्याने पीएमपीसाठी आवश्यक असलेली टेक्नॉलॉजी, अस्तित्वातील टेक्नॉलॉजीचे अपग्रेडेशन, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना, उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना, पीएमपीच्या अस्तित्वातील मालमत्तेचा वापर करून उत्पन्न वाढविण्याच्या उपाययोजना, मार्गांचे सुसूत्रीकरण, उत्पन्न वाढीसाठी इतर पर्यायी स्रोतांची निर्मिती, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना, वाढत्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करणे. तसेच पीएमपीची प्रतिमा सुधारण्याची जबाबदारीही या कंपनीवर असणार आहे. अशा प्रकारचा आराखडा तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे या सल्लागार कंपनीकडून केवळ आराखडा केला जाणार नाही. तर पुढील तीन वर्षे ही कंपनी या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पीएमपीसोबत काम करणार असून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचीही जबाबदारी कंपनीवर असणार आहे.