शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीत आता ठेकेदारांचे ‘ब्रेकडाऊन’

By admin | Updated: April 24, 2017 05:17 IST

पीएमपी सक्षण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी आता ठेकेदारी पद्धतीला रेड सिग्नल दिला आहे.

पुणे : पीएमपी सक्षण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी आता ठेकेदारी पद्धतीला रेड सिग्नल दिला आहे. सेवेत कसूर करणाऱ्या पीएमपीतील विविध ठेकेदारांचे करार रद्द करण्याबाबत मुंढे आग्रही असल्याचे समजते. त्यांनी पीपीपी तत्त्वावर पीएमपीच्या बस चालविणाऱ्या एका ठेकेदाराला अशी नोटीस दिल्याचे समजते. त्यामुळे इतर ठेकेदारांचेही पीएमपीमध्ये ‘ब्रेकडाऊन’ होण्याची चर्चा सुरू आहे.पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी पत्रकारांशी बोलताना मुंढे यांनी ठेकेदारी पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भविष्यात पीएमपीतील ठेकेदारी पद्धत बंद होण्याचे संकेत त्याच वेळी मिळाले होते. त्यानंतर प्रवाशांना चांगली बससेवा मिळण्यासाठी त्यांनी पीएमपीतील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनाही खडे बोल सुनावले होते. पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या सुमारे १२०० व भाडेतत्त्वावरील सुमारे ८५० बस आहेत. भाडेतत्त्वावरील बस पाच ठेकेदारांमार्फत चालविल्या जातात, तर मालकीच्या २०० बसेस पीपीपी तत्त्वावर एका ठेकेदाराला चालविण्यास देण्यात आल्या आहेत. बसेससाठी सध्या पीएमपीला प्रतिकिलोमीटर ३८ रुपये वर्षाला सुमारे ४० कोटी रुपये मोजावे लागतात. या बसेस पीएमपीच्या मालकीच्या असूनही पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांपासून भाडेतत्त्वावरील बसेससाठी पीएमपीला दर महिन्याला कोट्यवधी रुपये ठेकेदारांना द्यावे लागत आहेत.