शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर विभागाकडून पीएमपीत चौकशी

By admin | Updated: March 29, 2017 02:55 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर विविध आगारांमध्ये झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा अदलाबदली प्रकरणाच्या चौकशीसाठी प्राप्तिकर

पुणे : नोटाबंदीच्या निर्णयानंतर विविध आगारांमध्ये झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा अदलाबदली प्रकरणाच्या चौकशीसाठी प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे नेल्याची माहिती सूत्रांनी दिली.नोटाबंदीच्या निर्णयानंतर ‘पीएमपी’च्या विविध आगारांमध्ये नोटांची अदलाबदली झाल्याचा प्रकार समोर आला होता. अधिकाऱ्यांसह पीएमपीबाहेरील अनेकांनी सुमारे ५९ लाख रुपयांची अदलाबदली केल्याचे पीएमपी प्रशासनाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले आहे, तर ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुमारे सव्वातीन कोटी रुपयांच्या नोटांची अदलाबदली झाल्याचे आढळून आले. आगारातील काऊंटर कॅशिअर भरणा आणि वाहक व पास केंद्रावरील एकूण भरण्याच्या रकमेत मोठी तफावत दिसून आली. पीएमपीच्या लेखा विभागाने फरक काढताना एकूण भरणा गृहित न धरता काऊंटर कॅशिअर भरणा व बँक भरणा चलनातील फरक दाखविला आहे. त्यामुळे ही रक्कम कमी दिसत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. याप्रकरणी राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी प्राप्तिकर विभागाकडे तक्रार केली होती. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पीएमपी मुख्यालयात जाऊन माहिती घेतली. या वेळी पीएमपीतील काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांनी सर्व आगारांची नोटाबंदीच्या काळातील उत्पन्न, पाचशे व हजारांच्या नोटांची संख्या, बँकेत भरणा केलेल्या नोटांची संख्या याची सविस्तर माहिती घेतली आहे. तिकीट व पासविक्रीतून मिळालेल्या नोटा आणि प्रत्यक्ष जमा झालेल्या नोटांची पडताळणीही करण्यात आली. त्यामध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे काही आगारप्रमुखांना अधिकाऱ्यांनी या वेळी चौकशीसाठी बोलावले होते. काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह अधिकारी आगारांची बँक भरणा चलने घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)अहवालावर कारवाई नाहीचलेखा विभागाने केलेल्या चौकशीमध्ये ५९ लाख रुपयांची अदलाबदली झाल्याचे पुढे आले होते. त्यावर आगारप्रमुखांच्या बदल्या करून त्यांची चौकशी करण्याचा अहवाल प्रशासनाने प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार यांना दिला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कुणाल कुमार यांनी या अहवालाच्या अनुषंगाने आगारप्रमुखांकडून पुन्हा खुलासा मागविला आहे. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.