शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

पीएमपी अधिक प्रवासीभिमुख करणार

By admin | Updated: March 30, 2017 02:33 IST

आधीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय कायम ठेवून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा अधिक

पुणे : आधीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय कायम ठेवून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा अधिक प्रवासीभिमुख करणे व कामकाजाला व्यावसायिक स्वरूप आणण्याला प्राधान्य देणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे संकेतही मुंढे यांनी दिले.मुंढे यांनी बुधवारी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात विद्यार्थिदशेत असताना ‘पीएमपी’ने प्रवास केल्याची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. ‘पीएमपी’ची आर्थिक स्थिती, बस संचलन, बे्रकडाऊनचे प्रमाण, बससंख्या, प्रशासन तसचे इतर अडचणी काय आहेत, याचा अभ्यास करून अजेंडा ठरविला जाईल, असे सांगत मुंढे म्हणाले, नवी मुंबई पालिकेतील सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव आहे. तिथे सुमारे ५०० बस असून सुमारे तीन लाख प्रवासी आहेत. तिथल्या बससेवेत चांगली प्रगती केली आहे. इथल्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल. पण ही संस्था व्यावसायिक दृष्टिकोनातून चालावी, असा प्रयत्न असेल. हे करताना उत्पन्न आणि खर्च या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)‘पीएमपी’ यापुर्वी राबविण्यात आलेली चांगली धोरणे पुढेही सुरूच ठेवली जातील. तसेच इतर वाहतुक यंत्रणांमधून चांगल्या गोष्टी मिळत असतील तर त्याचाही विचार केला जाईल. नवी मुंबईमध्ये काही गोष्टी चांगल्या होत्या. त्या इथे असतील तर चालु ठेवू, नसतील तर त्या आणल्या जातील. ही एक सुधारणेची प्रक्रिया आहे. प्रवाशांना चांगली सेवा देणे, हे आपले उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी समजुन घ्यायला त्यांच्यात जायला मला काही अडचण वाटणार नाही, असे मुंढे यांनी सांगितले.जगातल्या कोणत्याही शहरात वाहतुक ही मोठी समस्या आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था कशी सक्षम करता येईल, हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आपण बससेवा पुरवू शकलो, तर निश्चितपणे आणि खासगी वाहने कमी करू शकतो. खासगी वाहने वाढण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुक चांगली करण्याला सगळीकडे प्राधान्य दिले जाते. हे करताना प्रवासी केंद्रस्थानी असतील. ‘उबेर’ सारख्या सेवा आयटीचा अधिक वापर आणि मागणीनुसार पुरवठा होत असल्याने यशस्वी ठरल्या आहेत. याचा विचार केल्यास सार्वजनिक सेवाही मागणीवर आधारीत होऊ शकतात. तसा दृष्टीकोन ठरवून काम करावे लागेल. त्यासाठी कष्ट करावे लागतील. त्याला किती वेळ लागेल हे सांगु शकत नाही. पण त्यामध्ये सातत्यपुर्ण सुधारणा व्हायला हव्यात. - तुकाराम मुंढे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपुणे महानगर परिवहन महामंडळ