शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

पीएमपी दिसणार डिजिटल नकाशावर

By admin | Updated: March 22, 2017 03:31 IST

बसथांब्यावर तासन्तास ताटकळत उभ्या राहणाऱ्या बसप्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांना आता मोबाईलवरच बसच्या प्रत्यक्ष वेळा कळणार आहेत.

राजानंद मोरे / पुणेबसथांब्यावर तासन्तास ताटकळत उभ्या राहणाऱ्या बसप्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांना आता मोबाईलवरच बसच्या प्रत्यक्ष वेळा कळणार आहेत. प्रवासी ज्या बसथांब्यावर उभे असतील, त्याठिकाणी बस कधी येणार, सध्या कुठे आहे याची सर्व माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) लवकरच एका मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पण केले जाणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी ‘पीएमपी’ ही सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आहे. सुमारे दहा लाखांहून अधिक प्रवाशांसाठी ‘पीएमपी’कडून बससेवा पुरविली जाते. दररोज शेकडो मार्गांवर जवळपास चार हजारांहून अधिक थांबे असून दररोज सुमारे १४०० ते १५०० बस मार्गांवर धावतात. शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढत निश्चित ठिकाणी पोहोचण्याची कसरत बसचालकांना करावी लागते. यादरम्यान अनेकदा कोंडीमध्ये बस अडकते, कधी ब्रेकडाऊन होते तसेच इतर कारणांमुळे अचानक बसफेऱ्या रद्द कराव्या लागतात. मात्र, फेऱ्या रद्द झाल्याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे प्रवासी नियमितपणे येणाऱ्या बसची वाट पाहत थांब्यावर उभे असतात. बस कधी येणार, ती सध्या कुठे आहे याबाबत ते पूर्णपणे अनभिज्ञ असतात. त्यामुळे अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करीत इतर पर्यायांचा आधार घेतात. मागील काही वर्षांपासून याचा फटका पीएमपीला बसला आहे. प्रवासी संख्या कमी होण्याबरोबरच उत्पन्नातही घट होत आहे. पुढील काळात मात्र ‘पीएमपी’ प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत प्रशासनाकडून लवकरच एक मोबाईल अ‍ॅप सुरू केले जाणार आहे. त्यासाठी पीएमपीने सर्व बसना जीपीएस यंत्रणा बसविली आहे. सध्या ‘ट्रॅफी’ हे अ‍ॅपचे नाव असून ते डाऊनलोडही करता येत आहे. त्यावर बसची माहितीही उपलब्ध होत आहे. अ‍ॅपचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याची माहिती ‘पीएमपी’तील सूत्रांनी दिली.