शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जागा न दिल्यास पीएमपी पोलीस चौकीत

By admin | Updated: January 22, 2017 04:56 IST

महिलांच्या राखीव जागेवर बसणाऱ्या पुरुष प्रवाशांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) कडक पावले उचलली आहेत. संबंधित महिला, वाहकाने

पुणे : महिलांच्या राखीव जागेवर बसणाऱ्या पुरुष प्रवाशांना आळा घालण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) कडक पावले उचलली आहेत. संबंधित महिला, वाहकाने उठण्याची वारंवार विनंती करूनही जागा सोडण्यास नकार देणाऱ्या प्रवाशाला थेट पोलीस चौकीत नेले जाणार आहे. संबंधित प्रवाशाविरुद्ध तक्रार दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.पीएमपी प्रशासनाने बसमध्ये महिलांसाठी डाव्या बाजूकडील सर्व आसने राखीव ठेवली आहेत. त्यानुसार या जागेवर पुरुष प्रवाशांना बसण्यास मनाई आहे. याबाबतचा निर्णय २०१२मध्येच घेण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू होती. मात्र, अनेकदा गर्दीतही या जागेवर पुरुष बसल्याचे दिसून येते. संबंधित महिला प्रवासी व वाहकाने विनंती केल्यानंतर हे प्रवासी जागेवरून उठतात. काही प्रवाशांकडून महिलांना दाद दिली जात नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशासोबत महिला व वाहकाचे वादही होतात. बसमध्ये गर्दी नसल्यास पुरुष प्रवाशांना महिलांच्या राखीव जागेवर बसण्यापासून कोणीही अडवत नाही. पण, गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना राखीव जागा देणे आवश्यक आहे, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.(प्रतिनिधी)१०० रुपये दंड आकारणारमहिलांना जागा न देणाऱ्या पुरुष प्रवाशाकडून यापुढे १०० रुपये दंड आकारला जाणार आहे. येत्या सोमवारपासून त्याची कडक अंमलवजावणी केली जाणार असून, त्याबाबत सर्व आगारप्रमुखांना कळविण्यात आले आहे. तसेच बसमधील वाहक व महिलांना दाद न देणाऱ्या पुुरुष प्रवाशांना बसमधूनच थेट पोलीस चौकीत नेले जाईल. तिथे तक्रार देऊन बस पुन्हा मार्गस्थ होईल. बसमध्ये वाद टाळण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. - बसमध्ये वारंवार विनंती करूनही दाद न दिल्यास संबंधित प्रवाशाला घेऊन बस थेट पोलीस चौकीत जाईल. या ठिकाणी बसचालक, वाहक व प्रवाशांना सहकार्य करण्याची विनंती पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षकांना केली जाणार आहे. प्रवाशांचा अधिक वेळ जाऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती पीएमपीचे महाव्यवस्थापक (वाहतूक) अनंत वाघमारे यांनी दिली.