शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी कर्मचाऱ्यांना वेतन फरक मिळणार

By admin | Updated: February 17, 2016 01:37 IST

पीएमपीमधील तब्बल साडेअकरा हजार कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीच्या करारानुसार द्यावयाच्या फरकाच्या रकमेसाठीचा ४० कोटींचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोमवारी पीएमपीकडे सुपूर्द केला.

पुणे : पीएमपीमधील तब्बल साडेअकरा हजार कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीच्या करारानुसार द्यावयाच्या फरकाच्या रकमेसाठीचा ४० कोटींचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोमवारी पीएमपीकडे सुपूर्द केला. मागील आठवड्यात पुणे महापालिकेनेही ५० कोटींचा निधी पीएमपीकडे वर्ग केला असल्याने या वेतनाच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील दोन दिवसांत हा फरक कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा फरकाचा निधी न दिल्यास पीएमटी कामगार संघ (इंटक) सह राष्ट्रवादी कामगार जनरल युनियन,तसेच महाराष्ट्र कामगार मंचाने आंदोलनाचा इशारा दिला होता.पीएमपी कर्मचाऱ्यांंच्या सुधारित वेतन करारानुसार दोन्ही महापालिकांनी वेतन फरकाचे २७० कोटी रुपये तीन टप्प्यांत देण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार २०१४ ते २०१५ या वर्षात ९० कोटी रुपये देण्याचा ठराव दोन्ही महापालिकांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे महापालिका ५० कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ४० कोटी रुपये देणार आहे. दोन्ही महापालिकांनी २०१४ मध्ये फरकाचे ९० कोटी रुपये दिले होते. तर, गेल्या वर्र्षी निधीसाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. मात्र, वर्ष संपून नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरही निधी देण्यात आला नव्हता. त्यामुळे पीएमटी कामगार संघ (इंटक)सह विविध कामगार संघटनांनी तातडीने निधी देण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मागील आठवड्यात पुणे पालिकेने तातडीने आपल्या हिश्श्याचा निधी मंजूर केला आहे. मात्र, पिंपरी पालिकेचा निधी न मिळाल्याने प्रशासनाकडे एक रुपयाचा निधीही कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलेले नव्हते. अखेर मंगळवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हा निधी मंजूर करून त्याचा धनादेश महापौर सुशीला धराडे, आयुक्त राजीव जाधव, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींकडे दिला. पीएमपीचे लेखापाल विभागाचे कर्मचारी मन्सूर शेख यांनी हा धनादेश स्वीकारला.