शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना साकडे

By admin | Updated: May 11, 2017 04:40 IST

पीएमपीच्या सेवेत असलेल्या महापालिकेत कार्यरत असणाऱ्या पावणेदोनशे कर्मचाऱ्यांना पिंपरी महापालिकेत रुजू करून घ्यावे,

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पीएमपीच्या सेवेत असलेल्या महापालिकेत कार्यरत असणाऱ्या पावणेदोनशे कर्मचाऱ्यांना पिंपरी महापालिकेत रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली आहे. पीएमपी व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहनकडील (पीसीएमटी) अतिरिक्त ठरणारे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग केले होते. तुकाराम मुंढे यांनी पीएमपीची सूत्रे हाती घेताच महापालिकेस दिलेल्या कर्मचाऱ्यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) नितांत गरज असल्याने पीएमपीकडे वर्ग करण्यात यावे, असे पत्र पिंपरी महापालिकेला दिले होते. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांना पीएमपीत तत्काळ रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले. त्यानंतर देखील रुजू होण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत होते. परंतु, तुकाराम मुंढे यांनी रुजू न झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचारी १३ एप्रिल रोजी पीएमपीमध्ये रुजू झाले होते. या प्रश्नावरून चिंचवड आणि भोसरीच्या भाजपा नेत्यांमध्ये मतभेदही उघड झाले होते. याबाबत कामगारांनी नेत्यांचे उंबरेही झिजविले होते. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या. मात्र, या कामगारांवरून राजकारण सुरू झाले आहे. त्यांना कोणीही वाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.