शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी चालकाला हडपसरमध्ये मारहाण

By admin | Updated: October 12, 2016 02:17 IST

पीएमपी चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे़ अमीर रफिक शेख (वय २०) आकाश मुकेश सोनवणे

पुणे : पीएमपी चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे़ अमीर रफिक शेख (वय २०) आकाश मुकेश सोनवणे (वय २१, दोघे रा़ सय्यदनगर, हडपसर) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे़याप्रकरणी पीएमपी चालक राजेंद्र व्हंताळे (वय ४९, रा़ वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना हडपसर येथील वैदुवाडी सिग्नल चौकात सोमवारी दुपारी दीड वाजता घडली़ व्हंताळे हे कोथरुड डेपोतून बस घेऊन हडपसरकडे जात होते़ वैदुवाडी येथील सिग्नल चौकात बसला सिग्नल मिळाला असल्याने चालकाने ती पुढे नेली़ त्याचवेळी समोरुन सिग्नल तोडून मोटारसायकलवरुन चौघे जण आले़ अचानक समोर आल्याने व्हंताळे यांनी ब्रेक दाबला तरी बस मोटारसायकलला जाऊन टेकली़ यावरुन त्यांच्यात वादावादी झाली़ तेव्हा चौघांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली़ सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे़