शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातीच्या उत्पन्नाचा पीएमपीकडे नाही हिशेब

By admin | Updated: October 11, 2014 06:45 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रत्येक बसवर वेगवेगळ्या जाहिराती करण्यात आलेल्या असतात, पीएमपीच्या मोठ्या उत्पन्नाचा या जाहिराती एक भाग आहेत.

दीपक जाधव, पुणेपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रत्येक बसवर वेगवेगळ्या जाहिराती करण्यात आलेल्या असतात, पीएमपीच्या मोठ्या उत्पन्नाचा या जाहिराती एक भाग आहेत. मात्र, अडीच वर्षांपासून जाहिरातीतून किती उत्पन्न मिळाले, याची माहितीच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक उत्तर खुद्द पीएमपीनेच माहिती अधिकारांतर्गत दिले आहे. तसेच, जाहिरातीची थकीत बिले किती राहिली आहेत, याचीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.जाहिरातीमधून पीएमपीला किती उत्पन्न मिळते, याची विचारणा माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी केली. याबाबत अभिलेखावर माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले आहे.पीएमपीवर लावण्यात येत असलेल्या खासगी व सरकारी जाहिराती यामधून १ जानेवारी २०१२ ते १ जुलै २०१४ या काळात किती उत्पन्न मिळाले, याची तपशीलवार माहिती मिळावी. जाहिरातधारकांनी २००५ पासून किती बिले थकवली आहेत, तसेच आतापर्यंत किती दंड वसूल करण्यात आलेला आहे, याविषयी पीएमपीकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावर ही माहिती अभिलेखावर उपलब्ध नाही, असे एकच उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले आहे. पीएमपीच्या बसवर लावण्यात येणाऱ्या जाहिरातीचा ठेका अ‍ॅडक्राफ्ट आऊट डोअर मीडिया प्रा. लि. यांना करारानुसार दिले आहे. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या या उत्तरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पीएमपीने उत्पन्नाचा हिशेब ठेवला नसेल, तर आतापर्यंत त्यांचे आॅडिट झालेले नाही का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.