शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

पीएमपीने थेट विमानतळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2015 04:11 IST

नागरिकांना थेट विमानतळावर पोहोचविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने (पीएमपी) कोंढवा, कात्रज, कोथरूड, पाषाण, निगडी, धायरी,

पुणे : नागरिकांना थेट विमानतळावर पोहोचविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने (पीएमपी) कोंढवा, कात्रज, कोथरूड, पाषाण, निगडी, धायरी, हडपसर, चिंचवड येथून विशेष वातानुकूलित ४० बस सुरू केल्या जाणार आहेत. पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशीप (पीपीपी) अंतर्गत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, प्रवाशांना लोहगाव विमानतळापर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने त्यांना रिक्षा, कॅब यावर अवलंबून रहावे लागत आहे. विमानतळावर जाणाऱ्या व तेथून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी आरटीओकडे आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळावर पोहोचविण्यासाठी विशेष सुविधा पीएमपीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना विमानतळावर जाण्यासाठी थेट कोणतीही बस उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर जाण्यासाठी पीएमपीएमएलने बसची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात होती. यासाठी खासगी बस कंपन्यांची मदत घेऊन पीपीपी तत्त्वावर बस उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला पीएमपी संचालकांनी मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात ८ ठिकाणांहून ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याकरिता ४० वातानुकूलित बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विमानतळ परिसरामध्ये या बस उभ्या करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाबरोबर चर्चा झाली असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे लवकरच या बस सुरू होणार आहेत. स्वारगेट परिसरातील पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) बसेसला सीएनजी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) बारा गुंठे जागा देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय गुरुवारी पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या पंपावर पीएमपीच्या शंभर गाड्यांमध्ये गॅस भरण्यात येणार असून ही जागा देण्याच्या बदल्यात पीएमपीला प्रत्येक किलोमागे १ रुपया २० पैसे इतकी सवलत मिळणार आहे. त्यामुळे गॅससाठी पीएमपीचा दर महिन्याला होणारा खर्च ४ लाख रुपयांनी वाचणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. स्वारगेट परिसरात असलेली पीएमपीच्या मालकीची सर्वसाधारण अकरा ते साडेअकरा हजार चौरस मीटर जागा सीएनजी पंपासाठी दिली जाणार आहे. यातील ३०० चौरस मीटर जागेवर सीएनजी पंप उभारण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.