शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी हडपसर आगारामध्ये डिझेल घोटाळा?

By admin | Updated: April 10, 2017 02:30 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) हडपसर आगारामध्ये वैधमापन शास्त्र विभागाकडून डिझेलचा

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) हडपसर आगारामध्ये वैधमापन शास्त्र विभागाकडून डिझेलचा एक टँकर सील करण्यात आला. या टँकरमध्ये सुमारे ७८६ लिटर डिझेल कमी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रकार आधीपासून सुरू असल्याची चर्चा असून डिझेलमध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.‘पीएमपी’कडून दीड-दोन वर्षांपूर्वीपासून एका खासगी कंपनीकडून बससाठी डिझेलची खरेदी केली जात आहे. सर्व आगारांना याच कंपनीकडून डिझेलचा पुरवठा केला जातो. या कंपनीकडून टँकरद्वारे पीएमपीला डिझेल पुरविले जात आहे. शुक्रवारी हडपसर आगारामध्ये एक टँकर डिझेल घेऊन आल्यानंतर तेथील ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना डिझेल कमी असल्याची शंका आली. त्यांनी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. तसेच वैधमापनशास्त्र विभागाशीही संपर्क साधण्यात आला. वैधमापनच्या अधिकाऱ्यांनी डिझेलची मोजणी केली असता बारा हजार लिटरच्या या टँकरमध्ये ७८६.९४ लिटर डिझेल कमी आढळून आले. त्यामुळे हा टँकर पंचनामा करून सील करण्यात आला आहे. टँकरच्या आतमध्ये काही बदल करण्यात आला आहे का, याचाही पाहणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांकडून कंपनी व टँकर चालकाविरुद्ध तक्रार दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)खरेदी-वापराची माहिती संकलित करणार टँकरमधून पीएमपीला यापूर्वीही कमी डिझेल मिळाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे डिझेलमध्ये घोटाळा असल्याची चर्चा सुरू झाली असून, याबाबत आता पीएमपी प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. आतापर्यंत झालेली डिझेल खरेदी व वापर याची सर्व माहिती संकलित केली जाणार असल्याचे समजते.