शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीत ३ कोटींची झाली अदलाबदली

By admin | Updated: February 1, 2017 05:20 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) तेरा आगारांमध्ये नऊ दिवसांत तब्बल सव्वातीन कोटी रुपयांची अदलाबदली झाल्याचे समोर

- राजानंद मोरे,  पुणेनोटाबंदीच्या निर्णयानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) तेरा आगारांमध्ये नऊ दिवसांत तब्बल सव्वातीन कोटी रुपयांची अदलाबदली झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये एक हजार रुपयांच्या सुमारे १२ हजार ३०० आणि पाचशे रुपयांच्या सुमारे ४१ हजार १०० नोटांचा समावेश आहे. प्रशासनाकडून मात्र केवळ ५९ लाख रुपयांचीच अदलाबदली झाल्याचा दावा केला जात आहे. वाहक व पास केंद्रावरील नोटांचा भरणा आणि बँकेत भरलेल्या नोटांमधील फरक पाहिल्यास प्रशासनाचा हा दावा फोल ठरत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा केली. त्या रात्रीपासूनच पीएमपीच्या सर्व तेरा आगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटांची अदलाबदली झाली. हा प्रकार समोर आल्यानंतर पालिका आयुक्त व पीएमपीचे अध्यक्ष कुणाल कुमार यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लेखा विभागाकडून संबंधित आगार प्रमुखांकडून दि. ७ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत हजार व पाचशेच्या नोटांची माहिती घेण्यात आली. प्रत्यक्ष आगारांमध्ये जाऊनही ही माहिती घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या चौकशीमध्ये सर्वच आगारांमध्ये नोटांची अदलाबदली झाल्याचे स्पष्ट झाले आहे.विभागाने आगारनिहाय संकलित केलेल्या माहितीनुसार, दि. ७ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत वाहकांकडून हजार रुपयांच्या एकुण ६३२८ तर पाचशेच्या ३७००६ नोटा जमा करण्यात आल्या होत्या. बँक भरणा चलनाप्रमाणे मात्र नोटांची संख्या अनक्रमे २५९६४ आणि ११५५१२ एवढी दिसते. त्यामुळे एकूण नोटांचा फरक अनुक्रमे १२३३६ व ४११४३ एवढा दिसत असून त्यानुसार सुमारे ३ कोटी २९ हजार रुपयांची अदलाबदली झाल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाकडून मात्र केवळ ५९ लाख रुपयांची अदलाबदली झाल्याचा दावा केला जात आहे.आगारातील काऊंटर कॅशिअर भरणा आणि वाहक व पास केंद्रावरील एकूण भरण्याच्या रकमेत मोठी तफावत दिसून येते. लेखा विभागाने फरक काढताना एकूण भरणा गृहित न धरता काऊंटर कॅशिअर भरणा व बँक भरणा चलनातील फरक दाखविला आहे. त्यामुळे ही रक्कम कमी दिसत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. लेखा विभागाने केलेल्या पाहणीत सुमारे ४० टक्के वाहक सेवकांनी नाणेवारी केली नसल्याचे निदर्शनास आले. वाहक नाणेवारीमध्ये काही ठिकाणी खाडाखोड आढळून आली आहे. तसेच सहव्यवस्थापकीय संचालकांनी दि. ९ नोव्हेंबरपासून वाहकांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा न स्वीकारणाचा आदेश दिला होता. या नोटा परस्पर बदलु नयेत, असेही त्यात नमुद करण्यात आले होते. तरीही आगार कॅशिअरकडे वाहकांकडून नोटा जमा झाल्याचे दिसून आले आहे.आगारप्रमुखांच्या बदल्यांची शिफारसचौकशी अहवालामध्ये सर्वच आगारांमध्ये नोटा बदली झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वच आगारप्रमुखांच्या बदल्या करून सखोल चौकशी करण्याची शिफारस प्रशासनाकडून करण्यात आल्याचे समजते. याबाबत आयुक्त कुणाल कुमार अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी केली आहे.दि. ७ ते ११ नोव्हेंबर या काळातील पाचशे व हजाराच्या नोटांची स्थितीएक हजार पाचशेवाहक भरणा६३२८३७००६पास केंद्र भरणा७३००३७३६३एकूण भरणा१३६२८७४३६९बँक भरणा चलनाप्रमाणे२५९६४११५५१२फरक१२३३६४११४३फरकाची रक्कम१,२३,३६,०००२,०५,७१,५००एकूण अदलाबदली झालेली रक्कम ३,२९,०७,५००