शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचे बसथांबे बनले वाहनतळ

By admin | Updated: February 2, 2016 01:35 IST

पीएमपी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बसथांब्यांवर प्रवाशांनी थांबणे अपेक्षित असताना हे बसथांबे चक्क पार्किंगसाठी वापरले जात आहे

पुणे : पीएमपी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बसथांब्यांवर प्रवाशांनी थांबणे अपेक्षित असताना हे बसथांबे चक्क पार्किंगसाठी वापरले जात आहे. शहराचा मध्यवर्ती भाग तसेच उपनगरांमध्ये हे बसथांबे पार्किंग थांबे बनल्याने नागरिकांना बस मिळविण्यासाठी भर रस्त्यात थांबावे लागत असून, या अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर ना पीएमपी कारवाई करत आहे ना वाहतूक पोलीस. त्यामुळे हे बसथांबे काढून तरी टाका, अशा संतापजनक भावना हे प्रवासी व्यक्त करत आहेत.प्रवाशांच्या सुविधांसाठी पीएमपीकडून शहरात ठिकठिकाणी बसथांबे उभारण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने प्रशासनाकडून हे थांबे पदपथावर उभारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी थांबणाऱ्या बसेस रस्त्यावर थांबल्यास वाहतूककोंडी होऊ नये म्हणून त्याच्यासमोर बस थांबण्यासाठी दिशादर्शक पट्टे रस्त्यावर मारण्यात आले आहेत. मात्र, शहरात ज्या ठिकाणी नियमित वर्दळ आहे, तसेच पार्किंगसाठी जागा मिळत नाही, त्या ठिकाणी चक्क या बसथांब्यांवर अतिक्रमण करण्यात आले असून, थेट प्रवासी थांबण्याच्या जागेवरच वाहने पार्क केली जात आहे. विशेष म्हणजे या दुचाकी, चारचाकी, तर त्यात कमी म्हणून काय की रिक्षा थांबेही त्याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. या वाहनांच्या आड प्रवासी थांबल्यास बसचालकाला अनेकदा ते दिसत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी अशी पार्किंग केली आहे, त्या ठिकाणी न थांबता प्रवासी थेट रस्त्याच्या मध्यभागीच जीव मुठीत घेऊन थांबत आहेत. तर दुसरीकडे भर वर्दळीच्या रस्त्यावर प्रवासी घेण्यासाठी पीएमपी बस रस्त्याच्या मधोमध थांबत असल्याने वाहतूककोंडी होऊन अपघातांना सामोरे जावे लागत आहे.कारवाई कोण करणार? शहरात कोठेही वाहतुकीस अडथळा झाला तर त्यावर तोडगा काढण्याची तसेच जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे असते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्षात केवळ ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारे बसथांब्यांवर गाड्या लावल्याने एक प्रकारे वाहतूककोंडी तसेच वाहतुकीसही अडथळा होतो. त्यामुळे अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र, काही बसथांब्यांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तर ज्या पीएमपीचे हे प्रवासी आहेत, त्यांच्या या गैरसोयीकडे लक्ष देण्यासाठी पीएमपीलाही वेळ नाही. त्यामुळे अशा अनधिकृत पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.