शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या जुन्या-नव्या पासचे ‘दिव्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:45 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपी) दिव्यांगांना नवीन स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत जुना पास ग्राह्य धरण्याऐवजी पीएमपी वाहकांकडून दिव्यांगांना पूर्ण तिकीट काढण्याचा आग्रह केला जात आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपी) दिव्यांगांना नवीन स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत जुना पास ग्राह्य धरण्याऐवजी पीएमपी वाहकांकडून दिव्यांगांना पूर्ण तिकीट काढण्याचा आग्रह केला जात आहे. मात्र, अशी कोणतीही सूचना वाहकांना देण्यात आली नसून, नवीन पास मिळेपर्यंत जुना पास ग्राह्य धरण्यात येत असल्याचे पीएमपीच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.पीएमपीकडून दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. शहरात तब्बल साडेचार हजार दिव्यांग व्यक्तींकडून पीएमपी बस पास सवलत घेतली जाते. येत्या ३१ जुलैपर्यंत त्यांना नव्या स्मार्टकार्डचे वाटप करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत पीएमपीने साडेतीन हजार पास तयार केले असून, त्यातील २१०० ते २२०० पासचे वितरण केले आहे. अजूनही निम्म्या व्यक्ती नवीन पासच्या कक्षेबाहेरच आहेत.ज्ञानेश्वर शिंदे या दिव्यांग व्यक्तींने ‘लोकमत’कडे आपली व्यथा मांडली. मी, २० जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजीनगर ते शनिनगर या मार्गावरील बसमध्ये बसलो. मला स्वारगेटला जायचे होते. वाहकाने नवीन पास नसल्याने मला तिकीट घेण्यास भाग पाडले. गेल्या दहा दिवसांत दोनदा असा प्रकार घडला. या बाबत पीएमपीकडे तक्रार दाखल केली आहे. संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे म्हणाले, संघटनेकडे शिंदे यांच्यासह काही व्यक्तींनी अशाच स्वरूपाची तक्रार केली आहे. नवीन पास घेण्यासाठी येत्या ३१ जुलै पर्यंतची मुदत आहे. तोपर्यंत जुना पास ग्राह्य धरला पाहिजे. शहरातील अपंगांचे प्रमाण पाहता ही मुदत देखील प्रशासनाला वाढवावी लागेल. असे असताना नव्या पासचा आग्रह धरून दिव्यांगांना सवलत नाकारली जात आहे. तसेच तिकीट काढायला भाग पाडून इतरांसमोर अपमानित करण्यात येत आहे. दिव्यांगांना पुढील दाराने आत घेण्याची मुभा असूनही, ती वाहकांकडून नाकारण्यात येते.पीएमपीकडून दिव्यांगांचे साडेतीन हजार स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले आहेत. त्यातील २१०० ते २२०० पासचे वितरण झाले आहे. नवीन पासची मुदत ३१ जुलै अशी आहे. त्यामुळे तोपर्यंत जुना पास चालेल. नवीन स्मार्ट कार्ड नसणाºयांना तिकीट आकारावे अशा कोणत्याही सूचना नाहीत.- सुनील गवळी,वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी