शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

पीएमपीच्या ब्रेकडाऊनला लागणार ‘ब्रेक’

By admin | Updated: January 10, 2016 03:58 IST

पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या ठेकेदाराच्या ब्रेकडाउनला आता लगाम बसणार आहे. यापुढे ठेकेदारांची बस ब्रेकडाउनमुळे एका तासापेक्षा अधिक काळ रस्त्यावर थांबल्यास प्रतिबस ५०० रुपयांचा

पुणे : पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या ठेकेदाराच्या ब्रेकडाउनला आता लगाम बसणार आहे. यापुढे ठेकेदारांची बस ब्रेकडाउनमुळे एका तासापेक्षा अधिक काळ रस्त्यावर थांबल्यास प्रतिबस ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यासाठीचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ठेकेदाराच्या ब्रेकडाऊन होणाऱ्या बसची संख्या अधिक असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय आणि पीएमपीचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पीएमपीच्या दररोज सुमारे १५०० बस धावतात, त्यातील सुमारे ७५० बस ठेकेदाराकडून घेण्यात आलेल्या आहेत. त्या बसमधील सरासरी १३० ते १५० बस दररोज ब्रेकडाउनमुळे शहरातील रस्त्यावर बंद पडतात. या बस बंद पडल्यानंतर त्या रस्त्यावरून बाजूला काढण्याची, तसेच ती दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. पीएमपीच्या बस बंद पडल्यास त्या एका तासात दुरुस्त करून ती रस्त्यावर पुन्हा आणली जाते. मात्र, ठेकेदराच्या बसला अशा प्रकारचे बंधन नसल्याने त्यांच्या बस दिवसभर रस्त्यावर उभ्याच असतात. फेऱ्या अचानक रद्द झाल्याने पीएमपीला दरदिवशी लाखो रुपयांचा फटका बसतो. त्यामुळे या पुढे ठेकेदारांनी एका तासाच्या आत ब्रेकडाउन झालेली बस रस्त्यावरून काढून घेतली नाही, तर हा दंड आकारला जाणार आहे. त्याबाबत प्रशासनाने ठेवलेल्या निवेदनास अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी मान्यता दिली आहे.(प्रतिनिधी)वाहतूककोंडीतही भरशहरातील रस्त्यावर पीएमपीची बस बंद पडल्यानंतर ती तातडीने हलविली जाते. त्यासाठी एका तासाच्या आत ब्रेकडाउन वाहन पाठवून हे काम केले जाते. मात्र, ठेकेदाराच्या बस बंद पडल्यास त्या तासन्तास रस्त्यावर ‘जैसे थे’ असतात, तर त्या तातडीने बाजूला काढण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वदर्ळीच्या वेळी या बस बंद पडल्यास शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. दोन दिवसांपूर्र्वी शहरातील काही रस्त्यावर ९ ते १० बस बंद पडल्या होत्या. त्यामुळे जवळपास अर्ध्या शहरात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे शेकडो पुणेकरांना तासन्तास ताटकळत बसावे लागले होते.