शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

परदेशी विद्यार्थ्यांची संस्थाचालकांकडून लूट

By admin | Updated: July 12, 2015 00:11 IST

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई)राबविल्या जात असलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेदरम्यान शहरातील काही नामांकित

पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई)राबविल्या जात असलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेदरम्यान शहरातील काही नामांकित शैक्षणिक संस्थांकडून परदेशी विद्यार्थ्यांची तसेच भारतीय वंशाच्या परदेशी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे. त्याचप्रमाणे डीटीईची प्रवेशाची नियमावली आणि विद्यापीठाची नियमावली यात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी येत असून विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत.डीटीईने एनआरआय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत नियमावली प्रसिद्ध केली असून त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य किंवा संचालकांना भेटून प्रवेश घ्यावेत तसेच शिक्षण शुल्क समितीने निश्चित केलेले शुल्क भरून प्रवेश घ्यावा. परंतु, विद्यार्थ्यांकडून १ लाख २० हजार रुपये शुल्क घेणे अपेक्षित असताना काही संस्था मात्र, २ लाख ८० हजार रुपये शुल्काची मागणी करत आहेत. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांची लूट होत असल्याची भावना पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामार्फत प्रवेश दिले जातात. विद्यापीठाच्या व्यस्थापन परिषदेने त्यासंदर्भातील ठराव मंजूर केला आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या नियमाप्रमाणे विद्यापीठाकडून परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. मात्र, या नियमानुसार प्रवेश न देता प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत,अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या नियमावलीनुसार परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. प्रवेशप्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी विद्यापीठाने आॅनलाईन यंत्रणा उभी केली आहे. एखाद्या महाविद्यालयामधील कमी जागांसाठी जास्त अर्ज आल्यास हे प्रवेश सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेशप्रक्रियेबाबत आक्षेप घेण्यासारखा कोणताही विषय नाही.- डॉ. विजय खरे, संचालक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परदेशी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास राज्यातील काही मर्यादित महाविद्यालयाना एआयसीटीईतर्फे परवानगी देण्यात आली आहे. तसेच परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील नियमावली डीटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मात्र, याबाबत विद्यापीठाची नियमावली काय आहे, याचा माहिती घेतल्यानंतरच या प्रकरणाबाबत बोलणे योग्य ठरेल. सध्या यावर भाष्य करता येणार नाही. - दयानंद मेश्राम, सहसंचालक, डीटीई