शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गळके छप्पर, भिंतींना भेगा अन् अस्वच्छता, शासकिय कर्मचाºयांच्या वसाहतिची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:01 IST

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) शहरातील शासकीय वसाहतींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने गळके छप्पर, फुटलेली ड्रेनेज लाईन, भिंतींना पडलेल्या भेगा, अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त वातावरणातच शासकीय कर्मचाऱ्यांना राहावे लागले आहे.

 पुणे - राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) शहरातील शासकीय वसाहतींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने गळके छप्पर, फुटलेली ड्रेनेज लाईन, भिंतींना पडलेल्या भेगा, अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त वातावरणातच शासकीय कर्मचाऱ्यांना राहावे लागले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे शासकीय वसाहतींचे कामे करणे शक्य होत नसल्याचे काही पीडब्ल्यूडीच्या अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. मात्र, त्यामुळे सरकारी कर्मचाºयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.राज्यातील सर्वाधिक मुख्य कार्यालये पुण्यात आहेत. त्यामुळे पुण्यात काम करणाºया सरकारी कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, सर्वच कर्मचाºयांना शासकीय वसाहतीमध्ये खोली मिळत नाही. परिणामी अनेकांना भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहण्याची वेळ येते. शासकीय निवासस्थान मिळणाऱ्यांसाठीही काही महिने किंवा वर्ष-दोन वर्ष प्रतीक्षा करावी लागते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वसाहतींमधील डागडुजीची कामे केली जात नसल्याने वसाहतींची दुरवस्था झाली आहे. शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीसह, प्रादेशिक मनोरुणालय, येरवडा कारागृह व स्वारगेट येथील वसाहतींची दुरवस्था झाली आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्याचप्रमाणे मनोरुग्णालयातील कर्मचाºयांच्या वसाहतीमधील खोल्या आकाराने लहान असल्याने बहुतांश सर्वच कर्मचाºयांनी स्वत:च्या खर्चाने पत्र्याचे शेड उभे करून त्याचा राहण्यासाठी वापर सुरू केला आहे. त्याचप्रमाणे परिसरात अस्वच्छता असल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच वसाहतीच्या सभोवताली गवत उगवले असून, घाणीचे साम्राज्य पसरले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षतत्कालीन कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर यांनी येरवडा वसाहतींची पाहणी केली होती. त्याचप्रमाणे मोडकळीस आलेल्या वसाहतींची तत्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, अद्याप या इमारतींची दुरुस्ती झालेली नाही. सुमारे तीन वर्षांपासून खराब झालेल्या ड्रेनेज लाईनचे काम वारंवार तक्रारी दिल्यानंतर सुरू करण्यात आले आहे. येरवडा वसाहतीमध्ये मुबलक मोकळी जागा असूनही येथील मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाही. जुन्या उद्यानातील खेळणी तुटली असून, त्यांना गंज चढला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीमधील स्वच्छतागृहे बंद पडली आहेत. काही खोल्यांची डागडुजी न केल्यामुळे या खोल्या बंद करण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे तीन मजली इमारतीच्या भिंतींवर पिंपळाची लहान झाडे उगवली आहेत. परिणामी भिंतींना भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. उद्यानात सहा फूट उंचीचे गवत उगवले आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या मुलांनी खेळण्यासाठी कुठे जावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. इमारतीवर पावसाचे पाणी साचत असल्याने वरच्या मजल्यावर राहणाºया कर्मचाºयांचे स्लॅबचे घर गळू लागले आहे. घरांंच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याची तक्रार येथील कर्मचाºयांकडून केली जात आहे. घरे गळत असल्याने सर्वांनीच घरांच्या छपरावर ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचा कागद टाकला आहे.शासनाच्या धोरणामुळे निधी कमी पडतोयशासनाकडून प्राप्त होणाºया अपुºया निधीमुळे शासकीय वसाहतीमधील दुरुस्तीची कामे वेळेत करता येत नाहीत. त्यामुळे शासकीय वसाहतींची दुरवस्था झाली असल्याचे मान्य करावे लागते. परंतु, शासनाच्या नवीन धोरणानुसार ठेकेदारांकडून कामे करून न घेता कंत्राटी पद्धतीने देखभाल दुरुस्तीचे काम देण्याचा शासनाचा विचार आहे. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.- भारतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Governmentसरकार