शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीच्या वादंगावर आयुक्त निरुत्तर

By admin | Updated: February 8, 2017 03:30 IST

महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ मधील उमेदवार रेश्मा भोसले यांची भाजपाची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केली असताना अचानक त्यामध्ये बदल करून त्यांना

पुणे : महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ मधील उमेदवार रेश्मा भोसले यांची भाजपाची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केली असताना अचानक त्यामध्ये बदल करून त्यांना भाजपाचे उमेदवार घोषित करण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रश्नांची विचारणा करण्यात आली असता ते अक्षरश: निरुत्तर झाले. निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून भाजपाच्या हिताचे निर्णय घेतले जात नसल्याचा खुलासा त्यांनी या वेळी केला.महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ ड मध्ये रेश्मा भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आॅनलाइन अर्ज भरला होता. अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या वेळी दुपारचे २ वाजल्याने आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपून गेली होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नावाने भरलेला अर्ज व भाजपाचे एबी फॉर्म जोडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केला. त्यांच्या अर्जाची छाननी करताना आॅनलाइन अर्जात भरलेल्या पक्षाचे नाव व जोडलेले एबी फॉर्म यामध्ये विसंगती आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी त्यांची भाजपाची उमेदवारी ग्राह्य न मानता त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरला होता. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी रेश्मा भोसले यांचे प्रकरण विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले. निवडणूक आयोगाने भोसले यांची भाजपाची उमेदवारी ग्राह्य मानण्यात यावी, असे आदेश दिले. त्यानुसार भोसले यांना भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. आयुक्तांनी केवळ भोसले यांचेच प्रकरण विशेष बाब म्हणून निवडणूक आयोगाकडे प्रकरण पाठविण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. (प्रतिनिधी) आयुक्तांना विचारण्यात आलेले प्रश्नआॅनलाइन अर्जाची मुदत २ वाजता संपली असतानाही त्यांची भाजपाची उमेदवारी का ग्राह्य धरली?केवळ रेश्मा भोसले यांचेच प्रकरण निवडणूक आयोगाकडे का पाठविले?निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागितले नसतानाही आयोगाचा सल्ला का मागितला गेला? अर्ज भरताना तांत्रिक चुका झालेल्या केवळ भाजपाच्याच उमेदवारांना सवलत दिली गेली का?