शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड किल्ल्यावर होणार प्लास्टीकबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड किल्ला परिसर विकास आराखड्यानुसार पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून पुणे वनविभागाने किल्ल्यावर अनेक महत्त्वाचे बदल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सिंहगड किल्ला परिसर विकास आराखड्यानुसार पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून पुणे वनविभागाने किल्ल्यावर अनेक महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत किल्ल्यावर प्लास्टीकबंदी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, तसेच किल्ल्यावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात येणार असून, किल्ल्यावर जाण्यासाठी ई-वाहनांची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षण राहुल पाटील यांनी दिली.

सिंहगड किल्ले परिसराच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी मंगळवारी स्थानिक नागरिक, संयुक्त वनव्यवस्थापन समितीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

पाटील म्हणाले, सिंहगड किल्ल्यावर पर्यटनवाढीसाठी येत्या काळात आमूलाग्र बदल केले जाणार आहे. किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी पुरातत्त्व खाते आणि वनविभाग मिळून काम करणार आहे. सिंहगड पर्यटन विकास आरखड्यानुसार किल्ल्यावर यापुढे खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. वाहनतळासाठी किल्ल्याच्या खाली काही एकरात सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार आहे. येथून किल्ल्यावर जाण्यासाठी ई-वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडाचे पावित्र्य जपण्यासाठी किल्ल्यावर पूर्णपणे प्लास्टीकबंदी केली जाणार आहे. प्लास्टीक नेताना कुणी आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

स्थानिकांनी उभारलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल संपूर्ण किल्ल्यावर आहेत. मात्र, हे स्टॉल झोपड्यांमध्ये उभारलेले आहे. हे चांगले दिसत नाही. या व्यावसायिकांसाठी किल्ल्यावर दोन ठिकाणी फूड मॉल उभारण्यात येणार आहे. या फूड मॉलध्ये किल्ल्यावरील सर्व व्यावसायिकांना एकत्र आणले जाणार आहे.

किल्ल्यावरील वाहनतळाच्या ठिकाणी पार्किंगची समस्या आहे. ही समस्या दूर करण्यसाठी १५ इलेक्ट्रिक बसेस भाड्याने घेण्यासाठी पीएमपीएमएलसोबत करार करण्यात येणार आहे. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी किल्ल्यावर वॉटर फिल्टर प्लांट उभारण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे हा किल्ला लोकांचे आवडते ठिकाण बनले आहे. सर्व क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने किल्ल्याला दररोज भेट देतात. कोरोनामुळे सध्या पर्यटन बंद असले, तरी येत्या काळात लवकरच पर्यटन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

चौकट

स्थानिक उलगडणार किल्ल्याचा इतिहास

किल्ले सिंहगडाला मोठा इतिहास आहे. किल्ल्याची माहिती देणारे मोजकीच मंडळी आहेत. यामुळे किल्ल्यावरील जवळपास ३० स्थानिकांना गाइडचे प्रशिक्षण वनविभाग आणि पुरातत्त्व विभाग देणार आहे. यासाठी काही इतिहास तज्ज्ञांची बोलणी सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून किल्ल्यांचा संपूर्ण माहिती त्यांना दिली जाणार आहे. हे ३० जण गडावर मार्गदर्शक म्हणून काम करतील. यामुळे त्यांना उत्पन्न मिळेल आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना गडाविषयी अचूक माहिती मिळेल.

- राहुल पाटील, उपवनसंरक्षक