शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Plastic Ban : महापालिकेचाच फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:00 IST

प्लॅस्टिकबंदी अमलात आणण्यापूर्वी सरकारने पूर्वतयारीसाठी तब्बल तीन महिने दिले, मात्र तरीही प्रशासनाची आज बंदी अमलात आणण्याच्या पहिल्याच दिवशी भंबेरी उडाली.

पुणे : प्लॅस्टिकबंदी अमलात आणण्यापूर्वी सरकारने पूर्वतयारीसाठी तब्बल तीन महिने दिले, मात्र तरीही प्रशासनाची आज बंदी अमलात आणण्याच्या पहिल्याच दिवशी भंबेरी उडाली. दंडासाठीच्या जुन्या पावत्यांचा आधार घेत शहरात आज ७३ कारवाया करून ३ लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांना दंडातून सूट देत त्यांच्याकडून फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या काढून घेण्यात आल्या. मात्र उद्यापासून त्यांनाही दंड करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.प्लॅस्टिकबंदी अंमलात येऊ नये यासाठी उत्पादकांकडून बरेच जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र त्यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायालयाने २० जुलैची वेळ दिल्यामुळे बंदी अंमलात येणारच हे शुक्रवारी रात्रीच स्पष्ट झाले. त्याची तयारीच महापालिका प्रशासनाने केली नव्हती असे बंदीच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दिसून आले. आरोग्य निरीक्षक व सहायक आरोग्य निरीक्षक अशा १७० जणांची नियुक्ती प्रशासनाने यासाठी केली आहे. त्यांची संपूर्ण शहरासाठी म्हणून १७ पथके तयार करण्यात आली असून, त्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.दिवसभरात या पथकांनी शहरात वेगवेगळ्या भागांत एकूण ७३ ठिकाणी कारवाई केली. त्यातून ३ लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांना यातून सूट देण्यात आली, मात्र त्यांच्याजवळच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तसेच अन्य साहित्य जप्त करून घेण्यात आले. असे ८ हजार ७११ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. ७५ किलो थर्माकोलही जप्त करून घेण्यात आले. शनिवारी सकाळपासून ही सर्व पथके त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कार्यरत झाली.दरम्यान पथकाकडून दंड वसूल करताना दिल्या जात असलेल्या पावतीवरही काही जणांनी आक्षेप घेतले आहेत. ही पावती महापालिका इतर कारवायांमध्ये करते त्याच दंडाची आहे. प्लॅस्टिकबंदीच्या कायद्याचा किंवा पहिल्यांदा, अथवा दुसऱ्यांदा दंड केला जात आहे याचा काहीही उल्लेख त्यावर नाही. न्यायालयाने प्रशासनाला तयारीसाठी म्हणून तब्बल तीन महिन्यांचा अवधी दिला होता. या कालावधीत प्लॅस्टिकबंदीसाठी अमूक कायद्यान्वये दंड असे छापून घेणे सहज शक्य असतानाही प्रशासनाने तसे केलेले नाही. नव्या पावत्या रविवारी सायंकाळी मिळणार असल्याचे काही अधिकाºयांनी याविषयी विचारले असता सांगितले.दुकानदारांचे आंदोलन; कारवाई मागेसिंहगड रस्त्यावर एका पथकाने दुकानदारांकडे पॅकिंग करून आलेल्या मालाला प्लॅस्टिक पिशव्या होत्या म्हणून त्यांच्यावर कारवाई सुरू केली. थोड्याच वेळात सर्व दुकानदार एकत्र आले. त्यांनी हा सर्व माल उत्पादकांकडूनच आमच्याकडे आला, अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली. पथकातील अधिकारी त्यांचे ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली.कारवाई रोज सुरू राहणारमहापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्लॅस्टिकबंदी कायद्याची अंमलबजावणी आज दिवसभरात करण्यात आली. १७० अधिकाºयांची १७ पथके त्यासाठी स्थापन केली आहेत. महापालिकेने नागरिकांना आज दंड न करता त्यांच्याकडून प्लॅस्टिक फक्त जप्त केले असले तरी उद्यापासून मात्र त्यांच्यावरही दंडाची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई रोज सुरू राहणार आहे.- सुरेश जगताप, सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी