शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

संत कान्होपात्राच्या समाधिस्थळी पुणेकराने दिलेल्या तरटीच्या वेलीचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:09 IST

पुणे - संत वाङ्मयात अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या तरटी म्हणजेच वाघाटी या वनस्पतीचे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ...

पुणे - संत वाङ्मयात अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या तरटी म्हणजेच वाघाटी या वनस्पतीचे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात रोपण करण्यात आले. संत कान्होपात्रा यांची समाधी याच ठिकाणी आहे. पूर्वीचा तरटीचा वृक्ष वठल्यामुळे त्याच ठिकाणी त्या वृक्षाचे रोप लावण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा संत कान्होपात्रा यांच्या समाधीत वाघाटीला बहर येणार आहे. पुण्यातील वनस्पती संशोधक डॉ. सचिन पुणेकर यांनी हे रोप उपलब्ध करून पंढरपूरला पाठविले आहे.

विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळीत संत कान्होपात्रेने यांनी समाथी घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात याच तरटी झाडाच्या रूपात कान्होपात्रेला पाहिले जाते. कालांतराने हे झाड वाळून गेले. तिथे या झाडाचे वाळलेले ओंडके होते. त्याचेच दर्शन वारकरी घेत असत. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही, अशी वारकऱ्यांची धारणा आहे. भाविकांच्या श्रद्धेचा व त्यांच्याविषयी असलेल्या भावनांचा विचार करून विठ्ठल मंदिर समितीने येथे पुन्हा तरटीचे रोपण करण्याचा निर्णय घेतला.

वनस्पती संशोधक डॉ. पुणेकर म्हणाले,‘‘मंदिरातील तरटीचे झाड वठलेले होते. त्यामुळे त्याच ठिकाणी हेच झाड लावावे यासाठी मी विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना पत्र पाठवून विनंती केली होती. त्यानंतर समितीने ते मान्य करून आज मुख्यमंत्री, वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत तरटीच्या झाडाचे रोपण करण्यात आले.’’

—————————————

दिवे घाटातून मूळ शोधून बनवले रोप

मंदिर समितीने परवानगी दिल्यानंतर डॉ. पुणेकर यांनी दिवे घाटातील डोंगरावर फिरून वाघाटी शोधले. त्याचे तयार करून ते पंढरपुरला पाठविले.

——————————————-

तरटीविषयी थोडंसं...

तरटीचा वेल हा बहुवर्षीय असून, खोड गोलाकार होते. फांद्या इतरत्र पसरतात. काटे वाघाच्या नखासारखी असल्याने या वेेलीला वाघेटी असेही म्हणतात. फुले पांढरी किंवा फिकट गुलाबी असतात. फळ गोल, हिरवट-तांबूस असते. बिया आणि गरयुक्त फळ पिकल्यावर लाल होऊन तडकते. वाघाटी उष्ण, उत्तेजक व पित्तनाशक आहे. उष्णतेमुळे अंगावर वळ उठल्यावर मूळ उगाळून लेप लावतात. क्षयरोगावर ही अत्यंत गुणकारी औषध आहे. फळ कफ, वायू यांचा नाश करते. फळ उगाळून पाण्यातून पोटदुखीवर इलाज म्हणून पिण्यासाठी देतात.