शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

रोटरी करणार २ लाख वृक्षांचे रोपण

By admin | Updated: June 30, 2016 01:16 IST

येत्या १ जुलै रोजी आयोजित ‘हरित महाराष्ट्रा’साठीच्या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : राज्याच्या वन विभागाच्या वतीने येत्या १ जुलै रोजी आयोजित ‘हरित महाराष्ट्रा’साठीच्या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रो. पिनल वानखेडे, रो. देवव्रत शहाणे, रो. सुधांशू गोरे, रो. आनंद खैरनार, रो. मकरंद टिल्लू, रो. अजय वाघ या रोटेरियननी पुढाकार घेतला आहे. रोटरीच्या वतीने पुणे जिल्ह्यात सुमारे २ लाख वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक जीत सिंग यांच्या प्रेरणेतून ही योजना साकार होत आहे.रोटरीचे पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये एकूण १२४ क्लब आहेत. गेली अनेक वर्षे क्लब वैयक्तिक पातळीवर वृक्षारोपण करीत आहे. यामुळे दर वर्षी काही हजार झाडे लावली जातात. मात्र, आता या सर्व क्लबनी एकत्र येऊन एकाच दिवशी, एकाच वेळी जिल्ह्यामध्ये सगळीकडे झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. यासाठी, त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला होता. वन विभागाने रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ ला राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी १ जुलै रोजी आमंत्रित केले आहे.दरम्यान, वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख आणि कॉलेज आॅफ प्रेसिडंटचे संयोजक आनंद खैरनार यांच्याशी या कार्यक्रमाविषयी चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाची रूपरेषा निश्चित केली. दि. १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपणासाठी वन विभाग सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करणार आहे. रोटरी क्लब या कार्यक्रमासाठी स्वयंसेवक उपलब्ध करून देणार आहे. रोटरीने स्वयंसेवकांची आॅनलाईन नोंदणी सुरू केली असून, अधिकाधिक नागरिकांना यामध्ये सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)>सामाजिक कार्याला हातभाररोटरीचे सर्व १२४ क्लब या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असून, प्रत्येक क्लब किमान १०० स्वयंसेवकांची नोंदणी करीत आहे. हे स्वयंसेवक स्वखर्चाने वृक्षारोपणाच्या ठिकाणी जाऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार, वृक्षारोपण करणार आहेत. प्रत्येक व्यक्ती सुुमारे २५ ते ४० वृक्षांचे रोपण करेल, अशी माहितीही त्यांनी दिली. या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सहभागामुळे एका मोठ्या सामाजिक कार्याला हातभार लागेल आणि महाराष्ट्र हरित होण्यास मदत होईल, अशी भावनाही या वेळी रोटेरियननी व्यक्त केली.