शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बिबट्याप्रवण क्षेत्राबाबत उपाययोजनांचा आराखडा

By admin | Updated: September 23, 2015 03:08 IST

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यातील ७० गावे हे बिबट्यांच्या नागरी वस्तीजवळील वास्तव्याने संवेदनशील गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत़

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यातील ७० गावे हे बिबट्यांच्या नागरी वस्तीजवळील वास्तव्याने संवेदनशील गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत़ या गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत़ या गावांमध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या उपाय योजना करण्यात येणार आहे़ वन विभागाने यापूर्वी आंबेगाव आणि जुन्नरमधील बिबट प्रवण क्षेत्र म्हणून संवेदनशील ५९ गावे निश्चित केली होती़ गेल्या काही महिन्यात शिरुर तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्या आढळल्याने आता या गावांची संख्या ७० झाली आहे़ याबाबत उपवनसंरक्षक व्ही़ ए़ धोकटे म्हणाले, जंगलात असलेल्या बिबट्यांनी आता ऊसाच्या शेताला आपले आश्रयस्थान बनविल्याने या गावातील पाळीव जनावरे तसेच गावातील कुत्री व अन्य प्राणी त्यांचे भक्ष्य होत आहे़ त्यातूनच मग माणसांवरही हल्ल्याचे प्रकार होऊ लागले आहेत़ या परिस्थितीत तेथील जनजीवन व जनावरे यांचे सरंक्षणाच्या दृष्टीने वन विभागाने उपाय योजनांचे आराखडे तयार केले आहेत़ या गावातील ग्रामस्थांना वन विभागाने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे़ त्यात बिबट्या दिसला तर काय करायचे? त्याच्यापासून स्वत:चे स्वंरक्षण कसे करायचे? याची माहिती ग्रामस्थांचे गट बनवून देण्यास सुरुवात केली आहे़ आतापर्यंत ५५ ग्रामस्थांना प्रशिक्षित केले आहे़ त्याचबरोबर जनजागृतीसाठी शाळेत माहिती देणे, वृक्षदिंडी, सभा घेतल्या जात आहे़ या गावांमध्ये होल्ंिडग लावून काय काळजी घ्यावी हे सांगितले जात आहे़ प्रमुख चार उपाययोजनाया गावांमध्ये ४ प्रमुख उपाय योजना करण्यात येणार आहे़ त्यात शौच्छासाठी ग्रामस्थांना रात्री, पहाटे रानात जावे लागते़ तोच वेळी या प्राण्याचे शिकारीसाठी बाहेर पडण्याचा काळ असतो़ त्यामुळे या सर्व गावात १०० टक्के वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे़ गोठ्यातील जनावरे बिबट्याची सहज शिकार होतात़ त्यासाठी बंधिस्थ गोठ्याचे मॉडेल तयार करण्यात आले असून ते उभारण्यास नरेगामार्फत सहाय्य देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे़ या गावातील विहिरीना कठडे नसल्याने अनेकदा शिकारीचा पाठलाग करताना बिबटे त्यात पडल्याची उदाहरणे आहेत़ अशा विहीरींचा सर्व्हे होत असून त्यांना कठडे बांधण्यात येणार आहे़ या गावांमध्ये अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे़ग्रामीण भागात अनेकदा पहाटे वीज खंडीत होते़ त्यामुळे गावातील भटकी कुत्री, जनावरे बिबट्यांचे आयतेच सावज ठरतात़ या गावांना अखंडित वीजपुरवठा होईल, यासाठी उपाय करण्यास महावितरणला सांगितले आहे़ शेतीसाठी थ्री फेजवरुन वीजपुरवठा हा पहाटे अथवा रात्री केला जातो़ त्यामुळे शेतकऱ्यांना नार्ईलाजाने वीज असेल, त्यावेळी मोटार सुरु करण्यासाठी अवेळी शेतात जावे लागते़ हे टाळण्यासाठी शेतीकरिता दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़ या गावांमध्ये करायच्या उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या समवेत आतापर्यंत ४ बैठका झाल्या असून आवश्यक त्या उपाय योजनांसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्यांना मान्यता मिळताच त्या विविध योजनांद्वारे त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्य वनसंरक्षक जीतसिंग यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)