शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका घेणार ‘एचए’ची जागा

By admin | Updated: June 11, 2017 03:52 IST

पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीची ५९ एकर जागा सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीची ५९ एकर जागा सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार आहे. त्यानुसार ही जागा बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान या प्रयोजनासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी कलम ३७ नुसार जागेच्या वापरात फेरबदल करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २० जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पिंपरी येथे एचए कंपनीची सुमारे ७० एकर जागा आहे. दरम्यान, कंपनी तोट्यात असल्याने या जागेची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशातून कंपनी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा विकण्यासाठी कंपनीने सरकारची २००१ मध्ये परवानगी घेतली आहे. त्यानुसार सुमारे ७० एकरपैकी ५९ एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांना योग्य वाटतील, अशा अटी व शर्तीवर विकण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. एचए कंपनीची ५९ एकर जागा शहरातील नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांसाठी घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्याचप्रमाणे ५९ एकर जागेच्या १० टक्के क्षेत्रावर महापालिकेची प्रशासकीय इमारत, सभागृह, उपहारगृह, दुकाने, गाळे, स्वच्छतागृह, गेस्ट हाऊस, कर्मचारी वसाहत, अग्निशामक केंद्र, एटीएम केंद्र, तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय आदींसाठी सोयीसुविधा उभारता येतील, असे प्रस्तावात नमूद आहे. दरम्यान, एचएच्या ५९ एकर जागेवर बहुउद्देशीय सार्वजनिक मैदानाचे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्याचा तसेच जिल्हाधिकारी ठरवतील त्या अटी व शर्तीस अधीन राहून भूसंपादन खर्च अदा करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. एच. ए. च्या जागेवर मोठ्याप्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी राडारोडा टाकला आहे. भविष्यात अतिक्रमण होण्याचीही शक्यता आहे. - एचए कंपनीची ५९ एकर जागा शहरातील नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांसाठी घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ही जागा मंजूर विकास योजनेत बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित केल्यास नागरिकांना विविध सोयीसुविधा निर्माण करता येणार आहेत. - प्रदर्शन भरविणे, सर्कस, विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक, व्याख्यानमाला, राजकीय सभा, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, स्नेहसंमेलन, वाहनतळ, हेलिपॅड आदींसाठी या जागेचा उपयोग करता येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे.- ५९ एकर जागेच्या १० टक्के क्षेत्रावर महापालिकेची प्रशासकीय इमारत, सभागृह, उपहारगृह, दुकाने, गाळे, स्वच्छतागृह, गेस्ट हाऊस, आदींसाठी सोयीसुविधा असतील.