शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोची जागा नगर परिषदेची की रेल्वेची?

By admin | Updated: April 29, 2017 03:55 IST

दौंड शहराच्या कचरा डेपो परिसरातील जागेचा वाद ५0 वर्षांनंतर उफाळून आला आहे. सदरची जागा नगर परिषदेची की रेल्वेची या वादावरून भविष्यात

मनोहर बोडखे / दौंडदौंड शहराच्या कचरा डेपो परिसरातील जागेचा वाद ५0 वर्षांनंतर उफाळून आला आहे. सदरची जागा नगर परिषदेची की रेल्वेची या वादावरून भविष्यात संघर्ष होणार असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दौंड-सिद्धटेक रस्त्यावर भीमनगरच्या परिसरात कचरा डेपो आहे. गेल्या ५0 वर्षांपूर्वी या कचरा डेपोसाठी दौंड नगर परिषदेने भाडेतत्त्वावर जागा घेतलेली आहे. परंतु कचरा डेपोच्या परिसरातील काही जागेवर रेल्वे खात्याने भिंत उभारण्यासाठी मोठी चारी खोदली आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सदरची जागा ही रेल्वेच्या मालकीची आहे. तर नगर परिषद म्हणते गेल्या ५0 वर्षांपासून या जागेचा ताबा आमच्याकडे आहे. तेव्हा कचरा डेपो परिसरातील या जागेसंदर्भात अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे खात्याने या जागेत भिंत उभारण्यासाठी खोदाई काम सुरू केल्याचे नगर परिषदेच्या लक्षात आल्यानंतर हे काम थांबविण्यासाठी नगर परिषदेने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविलेले आहे. दौंड नगर परिषद हद्दीतील कचरा डेपो येथे सुरू असलेल्या कंपाऊंड वॉलच्या कामाची नगर पालिकेची कुठलीही परवानगी न घेता रेल्वे खात्याने कामाला सुरुवात केली आहे. कचरा डेपो येथे गेल्या ५0 वर्षे कचरा टाकला जातो आणि ही जागा नगर परिषदेने भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. तेव्हा रेल्वे खात्याने तातडीने याबाबत नगर परिषदेकडे संपर्क साधावा आणि संबंधित वॉल कंपाऊंड उभारणीचे काम स्थगित ठेवावे, असे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.तर दुसरीकडे नगर परिषदेच्या पत्राला उत्तर देताना रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे की, ५0 वर्षांपूर्वी कचरा डेपोची जागा नगर परिषदेने भाडेतत्त्वावर घेतली आहे. याची माहिती अद्याप रेल्वेला नाही. तेव्हा नगर परिषद वापरात असलेल्या कचरा डेपोच्या परिसरातील काही जागा बेकायदेशीर आहे. संबंधित जागा रेल्वे खात्याची आहे. याबाबतची कागदपत्रे आपणाकडे पाठविले जातील, असे रेल्वे प्रशासनाने नगर परिषदेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.