सुनील राऊत - पुणो
शहरातील महिलांच्या सुरक्षित प्रवासाठी येत्या काही दिवसांत शहरात पिंक ऑटो उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या काही युवक-युवतींनी पुढाकार घेतला असून ब्लॅक गोल्ड सिटी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत.
देशातील प्रमुख मोठय़ा शहरांमध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्रत महिला पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत. कामा निमित्ताने या महिलांना विशेषत: आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणा:या या महिलांना रात्री-अपरात्री एका ठिकाणाहून दुस:या ठिकाणी प्रवास करावा लागतो. अशा वेळी या महिलांना अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा सामना करावा लागतो. तर अनेकदा आपले प्राणही गमवावे लागतात, ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनच्या युवकांनी पुणो
आणि नागपूर या दोन शहरांमध्ये रिक्षाने प्रवास करणा:या महिलांचे सर्वेक्षण केले असता, रिक्षामधून प्रवास करणा:या 10 मधील 7 महिलांनी एकटय़ाने प्रवास करताना, आपल्याला वेगवेगळ्या मानसिक त्रसांना
सामोरे जावे लागत असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. ही बाब लक्षात
घेऊन फाउंडेशनच्या वतीने हैदराबाद येथे वादा संस्थेच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी वादा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या पिंक
ऑटो उपक्रमाच्या धर्तीवर पुणो शहरातही हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे त्यासाठी वादा फाउंडेशनची मदत घेणार असल्याचे फाउंडेशनचे सदस्य विशाल
अक्केवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना, सांगितले. पहिल्या टप्प्यात फाउंडेशनच्या माध्यमातून तीन ते चार रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार असून, येत्या दोन महिन्यांत हा
उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
शासनाकडेही पाठपुरावा करणार
शहरी भागातील महिलांच्या सुरक्षेसाठी असलेला हा उपक्रम केंद्र आणि राज्य शासनाने 108 या अॅम्ब्युलन्स सेवेच्या धर्तीवर राबवावा यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे अक्केवार यांनी सांगितले. तसेच 108 ही सेवा वादा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविली जात असल्याने पिंक ऑटो सेवा पुण्यात त्यांच्याच माध्यमातून राबविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
महिलाचालक आणि जीपीएस यंत्रणाही
या रिक्षा महिलांच्या सुरक्षिततेसाठी असल्याने त्यामध्ये असलेली यंत्रणाही अत्याधुनिक स्वरूपाची असणार आहे. या रिक्षावर महिला चालक असणार असून, त्यात स्थानिक पोलीस स्टेशनशी कनेक्ट असलेली जीपीएस यंत्रणा असणार आहे. या शिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी अलार्म, पेपरस्प्रे, तसेच इतर साहित्य आणि इमजर्न्सी संपर्क क्रमांकही उपलब्ध असतील.
महिलांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अनेकदा प्रवास करताना, एक महिला म्हणून आम्हालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: शहरी भागात रात्री प्रवास करताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध झाल्यास महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
- अदिती शिवणीवार,
सदस्य, ब्लॅक गोल्ड
सिटी युथ फाउंडेशन