शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पिंगोरी ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या निवडणुकीवर बहिष्कार टाकत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नीरा :

पुरंदर तालुक्यातील पिंगोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या निवडणुकीवर बहिष्कार टाकत सर्वांनी अर्ज मागे घेतले होते. जोपर्यंत पिंगोरी गावाचा रस्ता दुरुस्त होत नाही आणि गावात मोबाईल टॉवर उभा केला जात नाही, तोपर्यंत येथून पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले असून आज पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी लवकरच ही कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.

पिंगोरी ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्यानंतर, मंगळवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित मंजूर कामाचे निविदा करण्यात येईल आणि पिंगोरीकरांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी पिंगोरी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदे, प्रकाश शिंदे, निलेश शिंदे, धनंजय शिंदे, सतीश खोमणे, हनुमंत कांबळे, माऊली यादव, सचिन शिंदे, तेजस शिंदे, मंगेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.

बाबासाहेब शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी साकुर्डे, पिंगोरी, वाल्हा या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र, राजकीय हेव्या दाव्यापोटी हे काम थांबवून ठेवण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या‌ आणि खासगी जागेतून जात असलेल्या या रस्त्यासाठी तत्कालीन लोकांनी आवश्यकता नसताना वनविभागाची सुद्धा परवानगी घेण्यास सांगुन सुद्धा वेळ घालवला. अर्थात, यासाठी वन विभागाच्या परवानगीची गरज नव्हती. मात्र, काम डवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर लोकांमध्ये आता चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पद्धतीने केली जाईल.

कोट

पिंगोरीकरांना झालेल्या त्रासामुळे त्यांनी बहिष्कारासारखा निर्णय घेतला. खरंतर हा रस्ता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तयार होणे अपेक्षित होते, मात्र हा झाला नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर संबंधित रस्त्याच्या इस्टीमेंट तयार करून ते निविदा प्रक्रियेत गेले आहे. मात्र, कोरोना आल्याने ही निविदा होऊ शकली नाही. सध्या तालुक्यामध्ये निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने यावर बोलले योग्य होणार नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालून निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

- संजय जगताप, आमदार