शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी पोलिसांच्या मोटारीला मिझोराममध्ये अपघात

By admin | Updated: February 9, 2015 04:01 IST

खुनाच्या तपासासाठी मिझोराम येथे गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या मोटारीला अपघात झाला. या अपघातात एका फौजदारासह दोन हवालदार जखमी झाले.

पिंपरी : खुनाच्या तपासासाठी मिझोराम येथे गेलेल्या पिंपरी पोलिसांच्या मोटारीला अपघात झाला. या अपघातात एका फौजदारासह दोन हवालदार जखमी झाले. ट्रकने धडक दिल्यानंतर मोटार रस्त्याकडेला अडकल्याने मोटार खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. यामुळे तिघेही बचावले. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मिझोरममधील कोलासीबजवळील बोप्तीयाल येथील घाटात घडली. फौजदार हरीश माने, हवालदार उत्तम पठारे, दादा धस अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी आॅटो क्लस्टर येथे झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी पोलिसांचे पथक महाराष्ट्राबाहेर मिझोरमला जाण्यासाठी ३ फेबु्रवारीला रवाना झाले. रेल्वेने कलकत्ता, गुवाहाटीमार्गे शुक्रवारी आसाममधील सिंचर येथे पोहोचले. तेथून पुढे मिझोरम येथील कोलासीब येथे जायचे होते. मात्र, लोहमार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने वेळेत रेल्वे उपलब्ध नव्हती. तर खासगी प्रवासी बस केवळ सायंकाळच्या वेळी असल्याने पिंपरी पोलीस शनिवारी सकाळी खासगी मोटारीने कोलासीब येथे जाण्यासाठी निघाले. हे अंतर ९० किलोमीटरचे आहे. सकाळी अकराच्या सुमारास बुख्तीयाल गावाजवळील घाटातून जात असताना नागमोडी वळणावर मोटारीसमोर अचानक एक भरधाव वेगातील ट्रक आला. पोलिसांच्या चालकाने मोटार जागेवरच थांबविली. त्यानंतर भरधाव ट्रक मोटारीला समोरच्या बाजूने धडकला. त्यामुळे मोटार मागे सरकून दरीच्या दिशेने गेली. त्यानंतर मोटारीचा काही भाग दरीत तर काही भाग रस्त्यावर अशी अवस्था झाली होती. या अपघातात मोटारीत पुढे चालकाच्या शेजारील आसनावर बसलेले पठारे यांच्या डोळ्याला जखम झाली, तर मागील आसनावरील फौजदार माने यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांच्या शेजारीच बसलेले धस यांच्या पायाला व बरगडीला मार लागला. (प्रतिनिधी)