शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार ३२ प्रभाग?

By admin | Updated: May 12, 2016 01:10 IST

राज्यातील १४ महापालिकांसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय अंतीम टप्प्यात आहे. त्यावर पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पिंपरी : राज्यातील १४ महापालिकांसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय अंतीम टप्प्यात आहे. त्यावर पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. चार वॉर्डांचा प्रभाग झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील प्रभागांची संख्या ३२ होईल. एका प्रभागातील मतदारांची संख्या सुमारे ४५ ते ५० हजार असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०११च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ इतकी आहे. फेब्रुवारी २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे १२ लाख मतदार संख्या असेल. दोन वॉर्डांचा की चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार, याबद्दल संभ्रमावस्था होती. चार वॉर्डांचा एक प्रभाग असावा, अशी भाजपाची आग्रही भूमिका होती. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार वॉर्डांच्या प्रभागाबद्दल सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे असाच निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. २००२ला तीन वॉर्डांचा एक प्रभाग अशा पद्धतीने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची निवडणूक पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदा झाली. त्या वेळी ३५ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे १०५ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २००७मध्ये एकसदस्यीय पद्धतीची निवडणूक १०५ वॉर्डांमध्ये झाली. २०१२ची निवडणूक पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची झाली. दोन वॉर्डांचा एक प्रभाग याप्रमाणे ६४ प्रभागांमध्ये निवडणूक घेण्यात आली. प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे १२८ नगरसेवक निवडून आले होते. त्याचवेळी महिलांना ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी झाली. आगामी २०१७च्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार वॉर्डांचा एकप्रभाग अशा पद्धतीने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची निवडणूक लढविली जाणार आहे. (प्रतिनिधी)चार वॉर्डांचा एक प्रभाग अशी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची निवडणूक झाल्यास फायदा होईल, असा विश्वास भाजपा नेत्यांना वाटतो. भाजपाशिवाय अन्य प्रमुख राजकीय पक्षांना बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबद्दल आक्षेप नाही. परंतु, दोन वॉर्डांचा एक प्रभाग व्हावा किंवा एकच वॉर्ड असावा, अशी त्यांची अपेक्षा होती. त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली होती. चार वॉर्डांचा एक प्रभाग या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला छोट्या राजकीय पक्षांचा, संघटनांचा विरोध आहे. अशा पद्धतीच्या निवडणुकीमुळे छोट्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती त्यांना वाटते. सामान्य कार्यकर्त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढायची असेल, तर त्यांनाही चार जणांचे पॅनेल तयार करणे भाग पडणार आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्तेही अशा पद्धतीच्या निवडणुकीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. काही राजकीय पक्षांना उमेदवारांचा शोध घेणे कठीण जाणार आहे. या पद्धतीच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणे अशक्य असल्याने कोणत्या ना कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळविण्याचा इच्छुकांकडून प्रयत्न होणार आहे.