शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनात पिंपरी-चिंचवड दर्शन

By admin | Updated: January 18, 2016 01:04 IST

पिंपरी-चिंचवड शहराची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. उत्कृष्ट असे नियोजन असून, अतिशय सुंदर शहर आहे. इतर महापालिकांनी व नगरपालिकांनी बोध घ्यावा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. उत्कृष्ट असे नियोजन असून, अतिशय सुंदर शहर आहे. इतर महापालिकांनी व नगरपालिकांनी बोध घ्यावा, अशा अभिप्रायाबरोबरच या शहराचा नागरिक असल्याचा सार्थ अभिमान असणारी मते नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दालनाला भेट दिल्यानंतर नोंदविली आहे. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालनामध्ये ‘सुंदर माझे पिंपरी-चिंचवड शहर’ हे शहर विकासाचे प्रतिबिंब असणारे दालन उभारले असून, त्याला आज महापौर शकुंतला धराडे, सुनेत्रा पवार, आयुक्त राजीव जाधव, पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका शमीम पठाण, नगरसेवक प्रशांत शितोळे आदींनी भेट दिली व महापालिकेने राबविलेल्या या उपक्रमाबाबत अभिनंदनही केले. महापालिकेने राबविलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती असणारी चित्रफित या दालनामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच छायाचित्रांद्वारे प्रदर्शनही या दालनात उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला हजारो नागरिकांनी भेट दिली असून, महापालिकेच्या या प्रकल्पांचे कौतुक केले. स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी सहकार्य करा, असा संदेश देणारे फलकही महापालिकेने या साहित्य संमेलनात लावले आहेत. पिंपरी-चिंचवड या नवनिर्मित पालिकेची वाटचाल अभूतपूर्व आहे. पुणे महानगराशेजारी असूनही पालिकेने घेतलेली झेप अभूतपूर्व आहे, अशा प्रकारचे अभिप्राय नागरिकांनी या दालनाला भेट दिल्यानंतर दिले आहेत. प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी प्रकल्पांची माहिती या वेळी दिली. (प्रतिनिधी)