शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे निलखला १३ वाहनांची तोडफोड

By admin | Updated: May 8, 2017 03:04 IST

पिंपळे निलख येथील पंचशीलनगर, गणेशनगर भागात रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींकडून १३ वाहनांची तोडफोड करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपळे निलख येथील पंचशीलनगर, गणेशनगर भागात रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींकडून १३ वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामध्ये ८ चारचाकी वाहने, ५ रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी दहशत माजविण्याच्या घटना सुरू झाल्या आणि निवडणुकीनंतर अशा घटनांचे सत्र सुरूच राहिले आहे. या दहशत माजविण्याच्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. शहराच्या विविध भागांत वर्षभरात वाहन तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. थेरगाव, भोसरी, आनंदनगर, चिंचवड, नेहरूनगर, सांगवी,काळेवाडी, वाकड आणि प्राधिकरण या भागात अशा घटना एक ते दोन वेळा घडल्या आहेत. आता पिंपळे निलख परिसरही अशा घटनांना अपवाद राहिलेला नाही, याचा प्रत्यय रविवारी पहाटे नागरिकांना आला. दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करणे, जाळपोळ करणे अशा गुन्ह्यात सापडलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत. काहींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नेहरूनगर, मिलिंदनगर भागातील गुंडांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अशा घटनांना आळा घालण्याच्या उपाययोजना पोलिसांनी केल्या. कठोर कारवाईचे पाऊल उचलले, तरी या घटनांना आळा बसत नाही. गुंडांना पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे पुन: पुन्हा अशा घटना घडत आहेत. भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमध्ये दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी रस्त्यात उभी असलेली दुचाकी पेटवून देण्याचा प्रकार महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये घडला होता. शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ वादातून काळेवाडीत अल्पवयीन मुलांनी रात्री बाराच्या सुमारास एका मोटारीची तोडफोड केली. बौद्धनगर, भाटनगरमध्ये दोन गटांत झालेल्या वर्चस्ववादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. ७ जुलैला घडलेल्या या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. आनंदनगरमध्ये तडीपार गुंड अविनाश पवार व त्याच्या साथीदारांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हत्यारे घेऊन वावरणाऱ्या गुंडांच्या टोळक्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. चिंचवडमध्ये २९ एप्रिलला सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या सहा दुचाकी खाक झाल्याची घटना उघडकीस आली. आनंदनगरमध्येही घातला होता धूडगुसआनंदनगरमध्ये २५ नोव्हेंबर २०१६ला दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली. दगडफेक करून दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर २९ नोव्हेंबरला तडीपार गुुंड व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. जामिनावर सुटून आल्यानंतर आनंदनगरमध्ये गुंडांच्या टोळक्याने धुडगूस घातला. पुन्हा वाहनांची तोडफोड केली होती.