शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दागिने पॉलिश करून घेताय... सावधान!

By admin | Updated: February 3, 2017 04:02 IST

शिरुर, खेड पाठोपाठ आता मंचरमध्येदेखील दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबवण्याची घटना उघड झाली आहे. त्यामुळे या मागे एखादी मोठी टोळी असण्याची

मंचर : शिरुर, खेड पाठोपाठ आता मंचरमध्येदेखील दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबवण्याची घटना उघड झाली आहे. त्यामुळे या मागे एखादी मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मंचर येथे तीन महिलांची अशाचपद्धतीने फसवणूक करून चोरट्यांनी पोबारा केला आहे. निघोटवाडी गावच्या लांडकमळा येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोघा चोरट्यांनी तीन महिलांचे दागिने लांबविले. ही घटना काल दुपारी घडली. या संदर्भात मंचर पोलिसांत तक्रार अर्ज देण्यात आली आहे.निघोटवाडी गावच्या दक्षिणेला लांडकमळा वस्ती आहे. काल दुपारी मोटार सायकलवरून दोन तरुण आले. ते हिंदीमध्ये बोलत होेते. खंडू बबन निघोट यांच्या घराजवळ तरुण थांबले. आम्ही कंपनीकडून आलो आहे. पावडरची जाहिरात करण्याचे काम आम्ही करतो. ही पावडर तुम्ही वापरा, असा आग्रह त्यांनी केला. घरात पुरुष मंडळी नव्हती. शेजारी शेजारी राहणाऱ्या धनश्री निघोट, कांताबाई निघोट व मंदा खंडू निघोट या तीन महिला तेथे जमल्या. या तरुणांनी त्यांना बोलून फसवले. सुरुवातीला तांब्याची भांडी आणावयास सांगितली. पावडर पाण्यात मिसळून त्यात गडू, ताम्हण धुतले असता ते स्वच्छ निघाले. त्यामुळे महिलांचा विश्वास बसला.मग आम्ही दागिने पॉलिश करतो. दागिने असेल तर पॉलिश करून घ्या, असे तरुण म्हणाले. महिलांनी दागिने देण्यास नकार दिला. तेव्हा देवसुध्दा उजळुन देतो असे त्यांनी सांगितले. धनश्री निघोट हिच्या पायात पैंजण होते. ट्रायल म्हणून त्यांनी धनश्रीचे पैंजण घेतले. खिशातून रूमाल व सोबत सफेद डबी काढून मिश्रण केले. त्यात पैंजण धुवुन देण्यात आले. पैजंन लख्ख झाले. त्यामुळे महिलांना हे तरूण नक्कीच कंपनीचा प्रचार करण्यासाठी आले आहेत असे वाटले. या दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या भामाबाई राजगुरू व जनाबाई भेके या महिला तेथे थांबल्या त्यावेळी त्यांनाही दागिने द्या असे दोघांनी सांगितले.यावेळी दोन्ही तरूणांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कांताबाई निघोट हिने एक तोळा वजनाचे गंठण, धनश्री निघोट हिने दीड तोळ्याचे मंगळसूत्र व कानातील पाऊण तोळयाचा दागीना, मंदा निघोट यांनी सोन्याचे गंठण पॉलीश करण्यासाठी दिले. चोरट्यांनी पावडरचे मिश्रण केले त्यात हे दागिने टाकले. दागिने बाहेर काढू नका, असे सांगून दोघे अर्ध्या तासात येतो, असे सांगुन परिसरात फिरून आले. यादरम्यान त्यांनी इतर काही घरांचा अंदाज घेतला. दोघे तरूण पुन्हा आले. त्यानंतर आतील दागिने पेपरवर ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे दागिने डब्यात झाकुन ठेवले. धनश्रीला घरातून हळद आणण्यास सांगण्यात आले. डबा लगेच उघडू नका, अशी सूचना दोघांनी केली. हळद आणण्यास महिला गेल्याचे पाहून दोघांनी तेथून दागिने घेवून धूम ठोकली. (वार्ताहर)शिरूरमध्येही अशीच चोरी1 शिरूरमध्येदेखील गेल्या आठवड्याभरापूर्वी अशाच स्वरूपाची घटना घडलेली होती. त्यामध्ये देखील एका महिलेचे मंगळसूत्र लांबवलेले होते. जाधवमळा येथे पॉलिश करण्याच्या बहाण्यानेच हे तरुण तिथे घुसले होते. 2डिटर्जंट पावडर विकण्याचे कारण दाखवले व डब्यात घालून पाण्यात गरम करून आणण्यास सांगितले. पंधरा मिनिटांनी डबा उघडण़्यास सांगितले तेव्हा डबा रिकामा होता. मंचरमध्ये घडलेल्या घटनेचे साधर्म्य दिसून येत आहे. अशीच घटना काही दिवसांपूर्वी खेडमध्ये देखील याच पद्धतीने घडली आहे. पोलीस गस्त घालणार दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून तसेच लक्ष विचलित करून दागिने लुटण्याचा प्रकार घडला आहे. खेडेगावात असे प्रकार घडतात. नागरिकांनी विशेषत: महिलांनी सतर्कता बाळगली पाहिजे. अनोळखी फिरते विक्रेते आले तर त्यांना घरात घेण्यास मज्जाव करावा. संशयित वाटल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे. चोरट्यांना पकडण्यासाठी नागरिकांचीही सतर्कता आवश्यक आहे. अशी टोळी जिल्ह्यात कार्यरत असण्याची शक्यता आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी आता छोट्या गावांत तसेच खेडेगावात पोलीस दुपारच्या वेळी गस्त घालणार आहेत. - सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक, मंचर