शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे फोटो काढणारा अटकेत

By admin | Updated: April 27, 2017 05:11 IST

खराडी परिसरातल्या एका आयटी कंपनीमधील महिलांच्या प्रसाधनगृहात घुसून कर्मचारी तरुणीचे फोटो काढण्याचा धक्कादाय

पुणे : खराडी परिसरातल्या एका आयटी कंपनीमधील महिलांच्या प्रसाधनगृहात घुसून कर्मचारी तरुणीचे फोटो काढण्याचा धक्कादायक प्रकार रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी हाऊस किपिंगचे काम करणाऱ्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. राजकमल राजबहाद्दूर यादव (वय 24, रा. थिटे वस्ती, खराडी मूळ बिहार) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात एका नावाजलेल्या बहुमजली इमारतीमधील आयटी कंपनीत तरुणी कंपनीमध्ये मनुष्यबळ विभागात काम करते. आरोपी हा मूळचा बिहारचा असून, गेल्या दोन वर्षांपासून तो हाऊस किपिंगचे काम करतो. फिर्यादी महिलेच्या कंपनीमध्ये कामगारांच्या पगारवाढीचे कामकाज सुरु आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत इतर सहकाऱ्यांबरोबर कंपनीत थांबावे लागले होते. ती रात्री पावणे दहाच्या सुमारास पाचव्या मजल्यावरील प्रसाधनगृहामध्ये गेली. छतामधील मोकळ्या जागेतून कुणीतरी फोटो काढत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने बाहेर येत आवाज देऊन त्याला बाहेर येण्यास सांगितले. त्यावेळी राजकमल पसार होण्याच्या प्रयत्नात असताना तरुणीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तिला ढकलून दिले. तरुणीने आरडाओरडा करत सुरक्षारक्षकाला आवाज दिला. सुरक्षारक्षकाने त्याला पाठलाग करून पकडले. वरिष्ठांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. चंदननगर पोलिसांनी तत्काळ घटनस्थळी दाखल होत राजकमलला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.