शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फोनची रिंग वाजतच असते

By admin | Updated: February 18, 2017 03:42 IST

शिवसेनेचे शहरप्रमुख, माजी आमदार विनायक निम्हण. परिस्थितीशी टक्कर देत शून्यातून साम्राज्य निर्माण केल्याने पाषाणमधील बंगल्याला

विश्वास खोड / पुणेशिवसेनेचे शहरप्रमुख, माजी आमदार विनायक निम्हण. परिस्थितीशी टक्कर देत शून्यातून साम्राज्य निर्माण केल्याने पाषाणमधील बंगल्याला नाव ‘झुंज’. त्यावर भगवा डौलाने फडकत असलेला. सकाळी पावणेसहालाच झोपेतून उठतात. आवरून सायकल चालवतच जिमला जातात. मनसोक्त व्यायाम करून झाल्यावर पावणेनऊच्या सुमारास पुन्हा घरी. आंघोळ, देवपूजा केल्यानंतर थेट जेवणच.घरातून निघतानाच जेवून निघण्याचा जुना शिरस्ता. घरात असताना पूर्णपणे कुटुंबवत्सल असलेले निम्हण घराबाहेर पडले की समाजाचे होऊन जातात. मग रात्री साडेआठ/नऊपर्यंत अधिकाधिक वेळ समाजकार्यात, राजकारणात आणि काही वेळ स्वत:च्या व्यवसायात ते पूर्णपणे रमलेले असतात. सध्या निवडणुकांची धामधूम असल्याने सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागते. रात्री घरी पोचायला उशीरही होतो.शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजलेले असतात. सोबत घरचा डबा घेऊन निम्हण आपल्या दिवसभराच्या मोहिमेवर निघतात.जे काम करतो ते आनंदाने, त्यामुळे कायम फ्रेश असतो, असे त्यांचे म्हणणे. जे काही काम करायचे त्याचा पूर्ण अभ्यास आणि नियोजन केले की काम चांगले होते. तेच आपल्या यशाचे रहस्य असे ते मानतात. सकाळी ९ पासूनच कार्यकर्त्यांचे फोन सुरू झालेले. ‘आबा’ असे टोपणनाव कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध. फोनमध्ये नंबर फीड असो नसो, चर्चा, मार्गदर्शन, समस्या निवारण सुरू असते. त्यात खंड नसतो. कोणी प्रचारासाठी, पदयात्रेसाठी या असा आग्रह धरून सतत फोन करत असलेला. शहराच्या वेगवेगळ्या भागांतल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधून कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, पलीकडच्या उमेदवाराकडून काही त्रास आहे का? काही अडचणी आहेत का? अशी चर्चा करता करता प्रवास सुरू असतो. कामाच्या व्यग्रतेमध्येही व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागतेच. भांडारकर रस्त्यावरील आॅफिसमध्ये जाऊन ते काही वेळ कामकाज करतात. वडगावशेरीमधील २ प्रभागांमध्ये आणि सिंहगड रस्त्यावरील २ प्रभागांमध्ये पदयात्रांमध्ये काही वेळ सामील होऊन ते कार्यकर्ते आणि उमेदवारांचा उत्साह वाढवतात.सध्या जरा दगदग, दमछाक वाढली आहे. त्यामुळे थोडीशी वामकुक्षी. पुन्हा फोनाफोनी सुरू. बोपोडी, पाषाण भागात कॉर्नर बैठका सुरु असतात, त्यांना हजेरी लावून घरी येईपर्यंत रात्रीचे पावणेनऊ वाजलेले असतात. कुटुंबासोबत गप्पा टप्पा, आणि जेवण. रात्री उशीरापर्यंत फोन सुरुच असतो.