भोर : भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांच्या घराबाहेर लावलेल्या मोटारीवर विटा फेकून काच फोडली, तर भिंतीवर झाडे लावलेल्या कुंड्या ढकलून फोडल्या. ही घटना सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील वाघजाईनगर येथे भोरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे राहतात. सोमवारी रात्री घरासमोर उभी असलेल्या मोटारीच्या (जीए ०३ एच ६३९६) काचा अज्ञाताने विटा फेकून फोडल्या. पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भोर प्रांताधिकाऱ्यांच्या मोटारीवर दगडफेक
By admin | Updated: February 21, 2017 02:13 IST