शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसह वॉटर स्पोर्ट्सला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:11 IST

पुणे : महापालिकेच्या हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या राज्य शासनाच्या प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि क्रीडा संघटनांच्या ...

पुणे : महापालिकेच्या हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या राज्य शासनाच्या प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि क्रीडा संघटनांच्या प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रबोधिनी/ स्पोर्ट्स अकॅडमी, वॉटर स्पोर्ट‌्स येत्या सोमवारपासून (दि. १८) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, विविध क्रीडा उपक्रम घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

यासोबतच यशदासारख्या शासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. वॉटर स्पोर्ट्स, नौकाविहारासारख्या वॉटर अ‍ॅक्टिव्हिटी पर्यटन संचलनालयाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार सुरू राहणार आहेत. मनोरंजन व करमणूक पार्क, इनडोअर एंटरटेन्मेंट अ‍ॅक्टिव्हिटी आणि पर्यटनस्थळे खुली राहणार आहेत. क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि क्रीडा स्पर्धांकरिता क्रीडा व युवक कल्याण विभाग यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचना व आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी आदेशामध्ये नमूद केले आहे.