शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील खासगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये खासगी क्लासेसना लागलेले टाळे तब्बल नऊ महिन्यांनंतर उघडण्यात ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये खासगी क्लासेसना लागलेले टाळे तब्बल नऊ महिन्यांनंतर उघडण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून खासगी शिकवण्या, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, लाईट हाऊस, टायपिंग व संगणक प्रशिक्षण केंद्र आदी सुरु करण्यास परवानगी दिली असून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद करण्यात आली होती. हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. व्यापारासह सार्वजनिक व्यवहारांवर असलेले निर्बंध हळूहळू उठविण्यात आले. काही दिवसांपुर्वीच शाळा आणि महाविद्यालये उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या आॅनलाईन शाळा सुरु होत्या. त्या अद्यापही सुरु आहेत. शिकवण्या सुरु करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे शिकवण्यांवर अवलंबून असलेल्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.

शाळा सुरु झाल्यानंतर आता पालिकेने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत खासगी इयत्ता ९ वीच्या पुढील विद्यार्थ्यांच्या शिकवण्या सुरु करण्यास परवानगी दिल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली. शिकवण्या सुरु करताना सुरक्षित अंतर राखण्याचे निकष पाळले जावेत असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे. यासोबतच शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून शिकवणीमध्ये थर्मल गन आणि आॅक्सिमीटरद्वारे दैनंदिन तपासणी करणेही बंधनकारक आहे. या शिकवण्यांची पालिकेच्या अधिका-यांकडून अचानक तपासणी केली जाणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

====

काय घ्यावी लागणार काळजी?

* सुरक्षित अंतर राखावे लागणार.

* शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक.

* थर्मल गन व आॅक्सिमीटरद्वारे तपासणी आवश्यक.

* सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा.

* केवळ ९ वीच्या पुढील विद्यार्थ्यांच्याच शिकवण्या घेता येणार.