शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी द्या!

By admin | Updated: January 6, 2016 00:47 IST

बारामती एमआयडीसीसाठी शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते;

बारामती : बारामती एमआयडीसीसाठी शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; मात्र स्थानिक भूमिपूत्रांना नोकरीत सामावून घेतले नाही. उलट परप्रांतीयांची भरती बारामती एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये अधिकारी आणि कामगार संघटनांच्या नेत्यांनी संगनमताने स्थानिकांना डावलून अन्य भागातील कामगारांना नोकरीवर घेतले आहे. या विरोधात स्थानिक भूमिपूत्रांनी ‘एल्गार’ पुकारला आहे. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.२० वर्षांपूर्वी बारामती एमआयडीसीसाठी रुई, तांदूळवाडी, कटफळ, जळोची, वंजारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने संपादित करण्यात आल्या. त्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत समावून घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांना त्याचा विसर पडला आहे. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमआयडीसीने झटकली.या कंपन्यांमध्ये कायम कामगार भरतीत स्थानिकांना डावलले जाते. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांच्या मुलांनादेखील न्याय मिळालेला नाही. त्यामुळे परिसरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी भूसंपादन करताना कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. सध्या परिसराचे नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक जीवनमानाचा दुष्परिणाम वाढत आहे. या स्थितीत येत्या ८ दिवसांत एमआयडीसीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपूत्रांना कायम नोकरीसाठी संधी द्यावी, अशी मागणी या परिसरातील तरुणांनी केली आहे. याबाबत एमआयडीसीचे मुंबईतील मुख्यालय, सर्व कंपन्या, प्रादेशिक कार्यालय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. ८ दिवसांत यावर तोडगा न काढल्यास एमआयडीसीतील पेन्सील चौकात कोणतीही पूर्व कल्पना न देता सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात केली जाईल, असे वंजारवाडी गावचे उपसरपंच दादा चौधर, सदस्य केशव चौधर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)