शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

उरळी-फुरसुंगी कचरा डेपो बाधितांच्या पात्र वारसांना कायमस्वरुपी नोकरी

By अतुल कुलकर्णी | Updated: August 23, 2017 19:30 IST

पुण्यातल्या कचरा डेपोचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे

पुणे शहरासाठीच्या उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन संपादित केलेल्या जमीन धारकांच्या पात्र वारसांना पुणे महानगरपालिकेत बिगारी संवर्गातील पदावर कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पुणे शहरातील कचरा टाकण्यासाठी 1989 आणि 2005 मध्ये पुणे जिल्ह्यातील उरळी-फुरसुंगी येथे एकूण 163 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. या जागेवर पुणे शहरातील कचरा टाकण्यात येत असून यासंदर्भात मध्यंतरी आंदोलनही झाले होते. तसेच या डंपिंग ग्राऊंडसाठी ज्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत अशा धारकांच्या कुटूंबातील व्यक्तींना पुणे महानगरपालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी आंदोलकांकडुन करण्यात आली होती. 

पुणे महानगरपालिकेने यापूर्वी 2010-11 च्या दरम्यान एकवट वेतनावर बाधित कुटुंबातील 57 व्यक्तींना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती दिली आहे. यासाठीच 26 ऑगस्ट 2014 च्या आदेशान्वये पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 62 बिगारी संवर्गातील पदांची निर्मिती केलेली आहे. त्यानुसार आजच्या बैठकीत बाधित कुटुंबातील एका व्यक्तीस याप्रमाणे एकूण 57 कार्यरत व्यक्तीस आदेशाच्या दिनांकापासून पुणे महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली.

सेवेत सामावून घेताना या कर्मचाऱ्यांना आदेशाच्या दिनांकापूर्वीच्या कालावधीचे वेतन व भत्ते यामधील फरकाचे किंवा इतर लाभ लागू असणार नाहीत. तसेच 57 वारसांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरुपी नियुक्ती देताना संबंधितांकडून सादर केलेल्या प्रमाणपत्रांची खात्री जिल्हाधिकारी स्तरावरुन करुन घेण्यात येणार आहे.