शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनीही विकासामध्ये योगदान द्यावे- गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 03:17 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

पुणे : प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ घेऊन शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व नागरीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदनावर आयोजित ध्वजवंदन समारंभानंतर बापट बोलत होते. कार्यक्रमास पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार नीलम गोºहे, आमदार माधुरी मिसाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, स्वस्त धान्य दुकानांतून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशिनचा वापर झाल्यामुळे गरिबांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर धान्य मिळत असून त्यामुळे केरोसीनची बचत झाली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे महिलांना गॅस जोडणी मिळाल्यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी गॅसवरील सबसिडी सोडून दिली आहे. मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनांच्या अंमलबजावणीमुळे शेतकºयांना फायदा झाला आहे.पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांना जाहीर करण्यात आलेली पदके आणि अन्य पारितोषिके पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. या वेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, एनसीसी व अग्निशमन दलाने संचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.जिल्हाधिकाºयांच्या हस्ते शनिवारवाड्यावर ध्वजवंदनजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारवाड्यावर ध्वजवंदन केले. या वेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उत्तम पाटील, रामदास जगताप आदी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उत्तम चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. शहराच्या सभोवताली असलेल्या भागाचा पीएमआरडीएतर्फे करण्यात येत असलेल्या विकास कामांमुळे आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसराचा विकास होणार असून हा भाग इकोनॉमिकल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन बापट यांनी केले. तसेच २६ जानेवारी ते १0 फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवाडा साजरा केला जात असून मतदारांनी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन बापट यांनी या वेळी केले.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनgirish bapatगिरीष बापट