शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा संवर्धनासाठी लोकांच्या पाठबळाची गरज

By admin | Updated: November 7, 2016 01:21 IST

तमाशा ही कला अनेक संकटांशी सामना करीत आहे, या लोककलेच्या संवर्धन व विकासासाठी पाठबळाची गरज आहे. तमाशा हे केवळ मनोरंजन नसून जातिवंत कला आहे

कळस : तमाशा ही कला अनेक संकटांशी सामना करीत आहे, या लोककलेच्या संवर्धन व विकासासाठी पाठबळाची गरज आहे. तमाशा हे केवळ मनोरंजन नसून जातिवंत कला आहे, असे मत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले. आपल्या यशामागची प्रेरणा सांगताना त्या आपल्या आईचा, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा आवर्जून उल्लेख करतात. नारायण खुडे, भाऊ बापू नारायणगावकर तमाशा मंडळ, आई विठाबाई भाऊ नारायणगावकर व माझी चौथी तर नितीनची पाचवी पिढी तमाशा क्षेत्रात आहे. यामध्ये मोठे बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी गॅस बत्तीवर आम्ही कार्यक्रम केले होते. आज इलेक्ट्रॉनिक झाले आहे. गोवा येथे तमाशा महोत्सवात माझ्या मंडळाची निवड झाली. त्या वेळी प्रवासाला जात असतानाच कोणीतरी कार्यक्रमास जाऊ नये म्हणून खोडसाळपणे निधनाची बातमी पसरवली. मात्र अशा गोष्टीकडे कधीही लक्ष दिले नाही.पती रामचंद्र बनसोडे यांनी भूमिका केलेले वगनाट्य सत्य घटनेवर आधारित असायचे. विष्णू बाळा पाटील, बापू बिरू वाटेगावकर, कारगिलच्या युद्धज्वाला, राजीव गांधी हत्याकांड, जन्मठेप कुंकवाची, चंदनतस्कर वीरप्पन, यामुळे आम्ही वेगळी ओळख निर्माण केली. उडत्या चालींच्या गाण्यांसह बैठकीच्या गाण्याला तसेच नवीन चित्रपटांच्या गाण्याला जास्त मागणी असते. महाराष्ट्रातील जत्रा, यात्रा, उरूस यासाठी सप्टेंबर ते मे असे ८ महिने कार्यक्रम चालू असतात.बदलत्या रुचीनुसार श्रोत्यांना काय हवे ते देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. माझे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले आहे. राज्य शासनाने मला अण्णा भाऊ साठे पुरस्कार, जीवनगौरव, असे पुरस्कार दिले आहेत. कार्यक्रम करून परतत असताना बसने पेट घेऊन झालेला अपघात हा आयुष्यातील सर्वात मोठा दु:खाचा क्षण होता. मात्र राज्य शासनाने मदत केली त्यामुळे आम्ही उभे राहिलो.(वार्ताहर)