शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे पळाले तोंडचे पाणी

By admin | Updated: March 3, 2016 01:29 IST

चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत

पिंपरी : चुकीच्या पाणीबिलांमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तक्रार करूनही दाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अगोदरच नियमितपणे पाणीपुरवठा होत नसताना बिलेही चुकीची येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. चुकीच्या बिलांमुळे फुगवटा वाढल्याने थकबाकी वसुलीत पाणीपुरवठा विभागास अपयश आले आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पाणीकपातीबाबत याच आठवड्यात बैठक होणार आहे. शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी पवना नदीद्वारे रावेत येथील बंधाऱ्यांवरून उचलून शुद्धीकरण करून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने दिवसातून एकवेळ पाणी पुरवठ्याचे नियोजन केले. त्यानुसार शहरात एकवेळ पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्याने पाटबंधारे विभागाने तातडीची बैठक घ्यावी, अशी सूचना पालिकेला केली आहे.पाणीपुरवठा नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने बैठक घ्यावी, अशी सूचना महापालिकेला केली आहे. त्यानुसार महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, पाणीपुरवठा अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक या आठवड्यात होणार आहे. चर्चेनंतर पाणीकपातीबाबत निर्णय होईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एक वेळ पाणीपुरवठ्याचे धोरण जाहीर करतानाच बांधकामासाठी वापरणाऱ्यांवर कारवाई करू. बिले न भरणारांचे नळजोड तोडू, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, यापैकी कोणतीही कारवाई विभागाने केलेली नाही. २०१४-१५ या वर्षात पाणीपट्टी आणि इतर वसुलीतून ६० कोटींचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागासमोर होते. मात्र, त्यांपैकी केवळ ३२ कोटींची वसुली झाली होती. २०१५-१६ या वर्षांसाठी ६५ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यात कपात करून ५६ कोटी करण्यात आले. मात्र, आजपर्यंत २५ कोटींची वसुली झाली आहे. (प्रतिनिधी)