शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

केसनंदमध्ये प्रलंबित पाणंद रस्ते जिल्हाधिकाऱ्यांकडून खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST

लोणी कंद : गावातील पानंद रस्ते, शिव रस्ते, शेतातील बांधावरचे रस्ते यातील अनेक वर्षातील, भावाभावांतील संघर्ष भावकीतील वाद कोर्टकचेरी ...

लोणी कंद : गावातील पानंद रस्ते, शिव रस्ते, शेतातील बांधावरचे रस्ते यातील अनेक वर्षातील, भावाभावांतील संघर्ष भावकीतील वाद कोर्टकचेरी यात वर्षानुवर्षे पिचलेल्या शेतकरी बांधवांना आशेचा किरण दिसला. केसनंद (ता. हवेली) येथे अनेक वर्षे प्रलंबित असलेला पाणंद रस्ता खुला करुन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या रस्ते सर्वासाठी खुले केले. या कामामुळे सुमारे ३०० एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

यांनी आज कोणताही गाजावाजा न करता महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी सह केसनंद येथे दाखल झाले. येथील पूर्व तसेच पश्चिमेकडील एकूण ३०० एकर क्षेत्राला फायदेशीर अशा एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे येथील ५० शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. या रस्त्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे.

या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार विजयकुमार चोबे, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन खरात, पवनकुमार शिवले, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, माजी सरपंच मिलींदनाना हरगुडे, तानाजी हरगुडे, एस.पी हरगुडे, संतोष हरगुडे, सरपंच सौ. रोहिणी सचिन जाधव, उपसरपंचसुनिता दिनेश झांबरे, ग्रामविकास अधिकारी गणेश वालकोळी तसेच सर्व सदस्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, बेजबाबदार नागरिकांवर आवश्यक कारवाई, तपासण्या व बाधितांचे विलगीकरण यासह विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा होऊन विकासकामांबाबत शक्य त्या सहकार्याची ग्वाहीही प्रशासनाकडून देण्यात आली.

पानंद रस्ते खुले करण्याची चांगली योजना आहे. रस्ता नसल्यास शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागतो पानंद रस्ते खुले झाल्यानंतर शेतकरी अनेक अडचणींतून मुक्त झाले.

मिलिंदनाना हरगुडे

माजी सरपंच केसनंद

" गावागावांत सलोखा व प्रगती साधण्यासाठी पाणंद रस्त्यासारख्या कामांबाबत शेतकऱ्यांनी हेवेदावे विसरुन एकदिलाने कामे करणे आवश्यक असून, कोरोनाप्रतिबंधासाठीही नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेत अतिक्रमित रस्ता खुला करणे, कच्चा रस्ता तयार करणे तसेच कच्चा रस्ता पक्का करणे, या तीन घटकांचा समावेश असून यासाठी, शेतकऱ्यांचे सह्कार्य अपेक्षित असते.

विजयकुमार चोबे, तहसीलदार, हवेली.

केसनंदमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे महत्त्वपूर्ण अशी पिण्याच्या पाण्याची मोठी योजना, अष्टविनायक महामार्गालगतची सुसज्ज ड्रेनेज व्यवस्था तसेच घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न प्रशासनाने प्राधान्याने मार्गी लावावा.

मिलींदनाना हरगुडे, माजी सरपंच, केसनंद.

केसनंद, येथे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या एक किलोमीटर लांबीच्या पूर्व-पश्चिम अशा पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवर.