शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बंद प्रकल्पामुळे २० लाखांचा दंड

By admin | Updated: February 20, 2016 01:09 IST

महापालिकेकडून बायोगॅस प्रकल्पाच्या उभारणीसाठी अनुदान घेऊन ते पूर्ण क्षमतेने न चालविल्याप्रकरणी एका ठेकेदारास २० लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे

पुणे : महापालिकेकडून बायोगॅस प्रकल्पाच्या उभारणीसाठी अनुदान घेऊन ते पूर्ण क्षमतेने न चालविल्याप्रकरणी एका ठेकेदारास २० लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कचरा प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोठा खर्च केल्यानंतरही तो कार्यान्वित न झाल्याने महापालिकेला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.हडपसर येथे महापालिकेने २००९ मध्ये ४५ लाख रुपये खर्च करून ५ टनाचा बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. आद्या एन्व्हायरोमेंटल बायोगॅस या कंपनीने हा प्रकल्प चालविण्यासाठी घेतला. दररोज ५ टन कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास ठेकेदाराला १ हजार रुपये दंड भरावा लागेल असे करारामध्ये नमूद करण्यात आले होते. ठेकेदाराने कचरा प्रकल्प चालवायला घेतल्यानंतर तो पूर्ण क्षमतेने चालविलाच नाही. त्यामुळे महापालिकेने आद्या एन्व्हायरोमेंटल कंपनीस २० लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कंपनीकडून काम काढून घेऊन दुसऱ्या ठेकेदाराकडे सोपविले जाणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली आहे.कचरा प्रकल्प उभारल्यानंतर ठेकेदारांकडून ते व्यवस्थित चालविले गेले नसल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. उरुळी देवाची येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा हंजर प्रकल्प उभा राहावा म्हणून महापालिकेने त्या प्रकल्पास कोट्यवधी रुपयांची मदत केली; मात्र तो प्रकल्प चालू शकला नाही. शहरातही अनेक ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे-छोटे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मधेच प्रकल्प बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे.