पुणे : महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाहतुकीचे उल्लंघन करण्याचे प्रमाण मोठे असल्याने वाहतूक शाखेने आज त्यांच्यावर पुणे शहर व पिंंपरी चिंंचवड परिसरात कारवाईचा बडगा उगारला. दिवसभरात २ हजार ६११ खटले दाखल केले. बेशिस्तांना चाप बसावा यासाठी विशेषत: महाविद्यालयांच्या परिसरात पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये विनापरवाना वाहने चालविणाऱ्या १९१ जणांचा समावेश असून ३९१ जण ट्रिपल सीट जाणारे तर २०७६ विना हेल्मेट दुचाक्या चालविणारे होते. या सर्वांवर केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे पोलिसांना २ लाख ८० हजारांचा महसूल मिळाला. वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड म्हणाले, या कारवाईत अल्पवयीन मुलेही आढळली असून महाविद्यालयांच्या परिसरात कारवाई सुरूच राहणार आहे.
नियमभंगाबद्दल बेशिस्त २ हजार ६११ कॉलेजकुमारांना दंड
By admin | Updated: February 24, 2015 01:30 IST