शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावांना दंड करा

By admin | Updated: May 8, 2015 05:31 IST

महापालिकेच्या जलतरण तलावाचे व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदारांकडून अवाजवी पद्धतीने शुल्कआकारणी करून लूट केली जात असल्याचे पुराव्यानिशी उजेडात

पुणे : महापालिकेच्या जलतरण तलावाचे व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदारांकडून अवाजवी पद्धतीने शुल्कआकारणी करून लूट केली जात असल्याचे पुराव्यानिशी उजेडात आल्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालयातील जलतरण समित्यांनी याची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊ लागली आहे. याचा गैरफायदा महापालिकेचे जलतरण तलाव चालविणाऱ्या ठेकेदारांकडून उचलला जात आहे. शहरात महापालिकेच्या मालकीचे २१ जलतरण तलाव आहेत, त्यांपैकी १५ तलाव चालू स्थितीमध्ये आहेत. या तलावांमध्ये पोहण्यासाठी मासिक ३५० रुपये, विद्यार्थ्यांसाठी मासिक २५० रुपये, वार्षिक पास ३,२०० रुपये, एका तासासाठी २० रुपये शुल्क निश्चित करून देण्यात आले आहे. मात्र, एका जलतरण तलावाचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी अवाजवी पद्धतीने शुल्क घेतले जात आहे. उन्हाळ्यामध्ये पोहण्यासाठी जात असलेल्या हजारो नागरिकांची यामुळे लाखो रुपयांची लूट होत आहे. काही तलावचालकांकडून ७०० ते ९०० रुपये महिना, तर तासाला ४० रुपये आकारले जात असल्याचे उजेडात आले होते.महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणात तातडीने चौकशी करून जलतरण समित्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘क्षेत्रीय कार्यालयस्तरावर जलतरण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ठेकेदारांकडून कराराच्या शर्तींचे पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी करून दोषी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’’