शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक फाट्यावर पादचारी पूल

By admin | Updated: January 20, 2016 01:17 IST

महापालिकेकडून नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपुला-जवळ पादचारी पूल (फूट ओव्हरब्रीज) उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे पादचाऱ्यांची सोय होणार आहे.

पिंपरी : महापालिकेकडून नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपुला-जवळ पादचारी पूल (फूट ओव्हरब्रीज) उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे पादचाऱ्यांची सोय होणार आहे. महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग, लोहमार्ग आणि पवना नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरत असला, तरी पादचाऱ्यांची मात्र गैरसोय होत आहे. कासारवाडी रेल्वेस्थानक, नाशिक फाटा बसस्थानक या परिसरात नागरिकांची नेहमीच गर्दी असते. रेल्वेने आणि एसटीने येणारे अनेक प्रवासी नाशिक फाटा येथे उतरतात. मात्र, रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे पादचाऱ्यांचा गोंधळ उडतो. अनेकदा छोटे-मोठे अपघातही घडतात. ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी नाशिक फाटा येथे पादचारी पूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हा पादचारी पूल उभारण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. त्यासाठी १५ कोटी ३१ लाख रुपये निविदा खर्च अपेक्षित धरण्यात आला. या निविदा प्रक्रियेत एका ठेकेदाराने ३५.१० टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच १० कोटी ४३ लाख ९० हजार रुपयांत काम करण्याची तयारी ठेकेदाराने दर्शविली. त्यानुसार या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने काम करून घेण्यासह त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. या पुलामुळे कासारवाडी गावठाण, बीआरटीएस बसथांबा, रेल्वेस्थानक याकडे जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. या पुलाची एकूण लांबी अडीचशे मीटर इतकी असून, यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. दुमजली पुलाप्रमाणेच या पादचारी पुलावरील विद्युत रोषणाईचा रंग ठेवण्यात येणार आहे. यामुळे नाशिक फाटा परिसर विद्युत रोषणाईने आणखीनच उजळून निघणार आहे. या पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती सहशहर अभियंता राजन पाटील यांनी दिली. तसेच देहू-आळंदी या रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड व रस्ता दुभाजकामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक कोटी २७ लाख ५६ हजार इतका खर्च करण्यात येणार आहे. या खर्चासही स्थायीने मान्यता दिली. पादचारी पुल उभारल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. यापूर्वी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता. परंतु आता पादचाऱ्यांची सोय होणार आहे.(प्रतिनिधी)