शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डाऊन सिंड्रोमवर मात करीत यशाचे शिखर

By admin | Updated: May 28, 2015 00:33 IST

डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असूनही जलतरण खेळात प्रावीण्य मिळविलेल्या ऋत्विकने आपल्या जिद्दीच्या जोरावर स्विमिंगची आवड जोपासत बारावी परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले.

राजानंद मोरे ल्ल पुणेडाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असूनही जलतरण खेळात प्रावीण्य मिळविलेल्या ऋत्विकने आपल्या जिद्दीच्या जोरावर स्विमिंगची आवड जोपासत बारावी परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले. त्याचे हे यश डोळे दिपवून टाकणारे आहे. त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. कारण लॉस एंजिल्सला होणाऱ्या स्पेशल आॅलिंपिक्स वर्ल्ड समर गेम्स स्विमिंग या स्पर्धेसाठी भारतातून चार मुलांची निवड झाली त्यापैकी ऋत्विक जोशी आहे.ऋत्विक हा आपटे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याने एमसीव्हीसीच्या इलेक्ट्रीकल मेटेनन्स ट्रेडमधून बारावीच्या परीक्षेमध्ये ५७.७१ टक्के गुण मिळवून यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, त्याला उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी मदतनिसाची गरज पडली नाही, घरीच त्यांच्या आईने त्यांचा अभ्यास घेतला. रोज चार तास तो नियमित अभ्यास करायचा. एकीककडे बारावीचा अभ्यास एकीकडे जलतरणाचा सराव, अशी तारेवरची कसरत तो करत होता. त्याने जलतरणाच्या अनेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले असून, त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा जुलैमध्ये होणार असून, या स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी तो सध्या चेन्नईला आहे. त्याचे आई-वडील माधवी व अभिजित जोशी यांनी त्याला दूरध्वनीवरून निकाल कळविला. निकाल ऐकून तोही आनंदित झाल्याचे त्यांनी सांगितले. 1अभिजित जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगतिले की, त्याला जन्मत: डाऊन सिंड्रोम हा आजार असल्यामुळे, तो शिक्षण घेऊ शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगूनसुद्धा केवळ आईच्या विश्वासामुळे त्याला शाळेत टाकले. आज हा विश्वास सार्थक झाल्यासारखा वाटतो. त्यांच्या आईने त्याच्याशी कोणत्या पद्धतीने बोलले पाहिजे यांचा अभ्यास केला. यासाठी हैदराबादवरुन काही पुस्तके मागविली आणि घरीसुद्धा त्याप्रकारचे वातावरण तयार केले. त्यामुळे आम्ही त्याला वयाच्या सहाव्या वर्षांपासून स्विमिंग क्लासला पाठविले, सुरुवातीला त्याला अनेक अडचणी आल्या, पण त्याची शिकण्याची आवड पाहून आम्ही थक्क झालो. 2‘माझ्या मुलाला मी कधी गतिमंद समजलेच नाही, त्यानेसुद्धा सर्वसामान्य मुलांप्रमाणे खेळावे-शाळेत जावे, असेच मला वाटायचे. त्यासाठी मी खूप धडपड केली कधी हार मानली नाही,’ असे माधवी जोशी यांंनी सांगितले. ऋत्विकच्या यशाबद्दल त्याचे महाविद्यालयातील शिक्षक गिरीश चांदेकर व जलतरण प्रशिक्षक सौरभ देशपांडे यांनीही आनंद व्यक्त केला.