शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सकाळी शांतता; सायंकाळनंतर रांगा

By admin | Updated: February 22, 2017 03:00 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरातील मतदारांनी उत्साहात मतदान केले. सकाळच्यावेळी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरातील मतदारांनी उत्साहात मतदान केले. सकाळच्यावेळी तुरळक गर्दी असलेल्या ठिकाणी सायंकाळी मात्र मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील १६०८ मतदान केंद्रांवर मिळून सरासरी ६८ टक्के मतदान झाले. तर मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी अंदाजे ८० टक्के मतदान झाले. अनेक उमेदवारांनी कुटुंबियांसह सकाळी लवकरच मतदान केले. सकाळी साडे नऊ ते दहा पर्यंत तुरळक मतदान झाले असताना दहानंतर काहीप्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढण्यास सुरुवात झाली. दुपारी बारापर्यंत मतदान झाल्यानंतर दुपारच्यावेळी पुन्हा मतदान केंद्राबाहेरील गर्दी कमी झाली. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर अक्षरश: शुकशुकाट होता. त्यामुळे निवडणूक कर्मचारीही निवांत होते. दुपारचे उन कमी झाल्यानंतर मतदार घरातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. तीननंतर हळूहळू मतदान केंद्रावरील गर्दी वाढू लागली. त्यामुळे केंद्रासमोर रांगा लागल्याचे पहायला मिळाले. मतदान प्रक्रिया संपण्यास कमी अवधी शिल्लक राहिल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी नियोजन केले जात होते. थेट घरापर्यंत वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. साडेचार पाचच्या सुमारास तर लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात झालेली गर्दी आणि लांबपर्यंत लागलेल्या रांगा याबाबतचे नियोजन करताना निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही कसरत करावी लागली. साडेपाच वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यावेळी प्रवेशद्वाराच्या आत असलेल्या मतदारांची मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. कोणतेही गैरप्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभागासह पोलिसांनीही चोख नियोजन केले होते. तरीही काही ठिकाणी तुरळक प्रकार घडले. दरम्यान, एका उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे दुसऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. एखाद्या भागात काही प्रकार ऐकण्यास आल्यास तातडीने कार्यकर्ते त्याठिकाणी धाव घेत होते. निवडणुकीमुळे शहरातील रस्तेही ओस पडल्याचे दिसून आले. मतदानासाठी सुटी असल्याने अनेकांनी मतदानानंतर घराबाहेर टाळले. यासह इतर नागरिकही मतदान प्रक्रियेत व्यस्त राहिल्याने शहरातील रस्त्यांवर वाहनांची फारशी गर्दी नव्हती. (प्रतिनिधी)मतदानावरून मळवंडी ठुलेत गोंधळपवनानगर : महागाव गणातील मळवंडी ठुले गावातील मतदारयादीत शिवणे गावातील सहा मतदारांची नावे समाविष्ट होती. पण, त्यांना एका गटाने मतदान करू न दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.दुपारी साडेचारच्या सुमारास मळवंडी ठुले येथील केंद्रावर मतदान सुरू असताना येथील मतदारयादीत शिवणे येथील काही मतदारांची नावे समाविष्ट होती. त्यानुसार ते मतदान करण्यासाठी मळवंडी येथे आले असताना एका गटाने त्यांना मतदान करण्यापासून रोखले. त्यामुळे काही काळ गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर तोडगा न निघाल्याने शेवटी येथील केंद्राध्यक्ष यांनी मावळचे निवडणूक अधिकारी यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. दरम्यानच्या काळात येथे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याने मोठा पोलीस फौजफाटा येथे पाठवण्यात आला. काही काळासाठी येथे जमावबंदीही लागू करण्यात आली. घटनेची माहिती फोनवरून कळाल्यानंतर संपूर्ण मळवंडी ठुले गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर केंद्राध्यक्ष बी.सी. ओव्हाळ यांनी तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्या आदेशानुसार व कायद्यातील तरतुदीनुसार मतदारयादीत समाविष्ट असलेल्या मतदारांना त्यांच्या ओळखपत्रांची तपासणी करून सायंकाळी सहाला त्यांना मतदान करण्याचा निर्णय दिला. सुमारे दीड तास तणावग्रस्त असलेली परिस्थिती पूर्वपदावर आली. नेहरूनगरमध्ये तणावपिंपरी : मतदानाचा कालावधी संपण्यास दहा मिनिटांचा कालावधी उरला असताना, नेहरूनगर येथील क्रांती चौकात हत्याराने भरलेले वाहन दाखल झाले. या वाहनातून आलेल्या टोळक्याने मतदारांपैकी एका दाम्पत्याला अडवले. आम्हालाच मतदान करा, लक्षात ठेवा, असे धमकावले. त्यावर ‘आम्ही आताच मत देऊन आलो आहोत. मतदान कुणाला करायचं हा आमचा प्रश्न आहे,’ असे त्या दाम्पत्याने सांगताच वाहनातून उतरून दोन-तीन जणांनी यमन्नप्पा वीटकर यांच्यावर हल्ला केला. महिलेला ढकलून दिले. वाहनात बसलेल्या एकाने बाहेर येऊन यमन्नप्पाच्या हातावर तलवारीने वार केले. यमन्नप्पा जखमी होताच, जमाव जमला. संतप्त जमावाने वाहनावर दगडफेक केली. मतदान करून आल्यानंतर भर चौकात टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पती यमन्नप्पा जखमी झाल्याची फिर्याद वनिता वीटकर (वय ३५, नेहरूनगर) यांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत दाखल केली. तुम्ही आम्हालाच मतदान केले पाहिजे, असे धमकावून एक प्रकारे दहशत माजविण्याचा प्रकार केला, असे वीटकर यांचे म्हणणे आहे. सामान्य माणसाने मतदान करायचे की नाही? माझे पती थोडक्यात बचावले. काये झाले असते, हे सांगता येत नाही. एमएच १४ ईपी ९६६६ या क्रमांकाच्या वाहनातून हल्लेखोर आले होते. या वाहनाच्या नंबरप्लेटवर कमळाचे स्टिकर आहे, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी उपचारासाठी यमन्नप्पा यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले.(वार्ताहर)मतदारावर हल्ला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉँग्रेसचे उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१,रा.नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. डोक्यात वार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी चपळाईने वार चुकविला. हाताला जखम झाली. सोमवारी रात्री घडलेली ही घटना ताजी असताना, मतदानाच्या दिवशी मंगळवारी भरदिवसा नंग्या तलवारी घेऊन आलेल्या टोळक्याच्या हल्ल्यात एका मतदार जखमी झाला. या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.